Advertisement

सीएनजीच्या दरात वाढ, रिक्षा-टॅक्सीचं भाडे वाढवण्याची मागणी


सीएनजीच्या दरात वाढ, रिक्षा-टॅक्सीचं भाडे वाढवण्याची मागणी
SHARES

इंधन दरवाढीचा भडका काही कमी होत नसून त्याचा फटका सर्वसामान्यांना महागाईच्या रुपाने बसत आहे. असं असताना आता सीएनजीच्या दारात तीन रुपयांची वाढ झाली आहे. तर वर्षभरात सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांना आर्थिक नुकसान होत असल्याचं म्हणत आता रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनानी पुन्हा एकदा रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ करण्याची मागणी उचलून धरली आहे. ही भाडेवाढ झाल्यास त्याचा मोठा फटका सर्वसामान्याना बसण्याची शक्यता आहे.


टॅक्सिमन युनियनची मागणी

रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ करावी ही मागणी गेल्या काही महिन्यांपासून मुंबई टॅक्सिमन युनियनकडून केली जात आहे. टॅक्सीचं भाडं तीन रुपयांनी तर रिक्षाचं भाडं दोन रुपयांनी वाढवण्याची मागणी आहे. म्हणजेच रिक्षाचं किमान भाडं वीस तर टॅक्सीचं किमान भाडं पंचवीस रुपये करण्याचीही मागणी आहे. यासंबंधीचा प्रस्ताव याआधीच संघटनेन मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणा (एमएमआरटीए)कडे ठेवला आहे.


अद्याप निर्णय नाही

अद्याप या प्रस्तावावर कुठलाही निर्णय झालेला नाही. गेल्या वर्षभरात सीएनजीच्या दरात तीनदा वाढ झाल्याने भाडेवाढ करण्याची आमची मागणी आहे. पण त्यावर अजून निर्णय झालेला नाही. असं असताना आता नुकतीच तीन रुपयांनी सीएनजीचे दर वाढले आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा भाडेवाढीची मागणी केल्याची माहिती मुंबई टॅक्सीमन युनियनचे अध्यक्ष ए. एल क्वाड्रोस यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. तर यावर निर्णय होण्यासाठी अजून काही वेळ पंधरा दिवस असल्याचंही सांगितलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा