Advertisement

मुंबई ते आळंदी बस सेवा सुरू, वेळापत्रक आणि मार्ग जाणून घ्या

मुंबई ते देवाची आळंदी अशी थेट बस सेवा सुरू व्हावी अशी मागणी मुंबईकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची होती.

मुंबई ते आळंदी बस सेवा सुरू, वेळापत्रक आणि मार्ग जाणून घ्या
SHARES

देवाची आळंदी या महाराष्ट्रातील एका प्रमुख तीर्थक्षेत्रासाठी देखील मुंबईहून थेट बस सेवा उपलब्ध नव्हती.

महाराष्ट्रातून नव्हे-नवे तर संपूर्ण भारत वर्षातून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी हजारो भाविक देवाची आळंदीला भेट देत असतात. मुंबई मधून देखील मोठ्या प्रमाणात देवाची आनंदी येथे दर्शनासाठी भाविक जात असतात. यामुळे मुंबई ते देवाची आळंदी अशी थेट बस सेवा सुरू व्हावी अशी मागणी मुंबईकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची होती.

दरम्यान आता ही प्रवाशांची मागणी मान्य झाली असून 21 एप्रिल 2023 पासून मुंबई ते देवाची आळंदी अशी नवीन बस सेवा सुरू झाली आहे.

कस आहे या बसचं वेळापत्रक

मिळालेल्या माहितीनुसार सेंट्रल मुंबई येथून सकाळी सात वाजता ही बस आळंदीच्या दिशेने रवाना होईल आणि दुपारी दीड वाजता ही बस आळंदी येथे पोहोचेल. या बसच्या परतीच्या प्रवासाबाबत म्हणजेच आळंदी ते मुंबईच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर दुपारी एक वाजून 45 मिनिटांनी ही बस मुंबईकडे रवाना होणार आहे.

बसचा मार्ग कसा असेल बरं?

भायखळा (प.) – काळाचौकी – दादर – कुर्ला – घाटकोपर (प.) – मानखुर्द – शिवाजीनगर

(गोवंडी) – सानपाडा – नेहरूळ (एल.पी.) – कामोठे – कळंबोली – पनवेल – खोपोली – कार्ला फाटा – तळेगांव डेपो – भंडारा डोंगर – देहू फाटा, श्री क्षेत्र देहू – मोशी – आळंदी देवाची असा या बसचा मार्ग राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

या बसमुळे आता मुंबई ते आळंदीचा प्रवास सोयीचा होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

विशेष बाब अशी की महाराष्ट्र राज्य शासनाने महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सवलत सुरु केली आहे. यामुळे मुंबई ते देवाची आळंदी दरम्यान सुरू झालेल्या या बस सेवेला मोठा प्रतिसाद महिलाकडून मिळणार. 



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा