Advertisement

ब्रिटिश एअरवेजचे वैमानिक संपावर, मुंबईहून लंडनला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा

ब्रिटिश एअरवेजच्या वैमानिकांनी पगारवाढीच्या मागणीसाठी संप पुकारला आहे.

ब्रिटिश एअरवेजचे वैमानिक संपावर, मुंबईहून लंडनला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा
SHARES

मुंबईहून लंडनला जाणाऱ्या तब्बल ६ हजार प्रवाशांना मोठ्या त्रासाला समोरं जावं लागणार आहे. कारण ब्रिटिश एअरवेजच्या वैमानिकांनी पगारवाढीच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. मंगळवारपासून हा संप पुकारण्यात आला असून, यामुळं मुंबई-लंडन प्रवाशांना फटका बसणार आहे.

१०० टक्के सेवा ठप्प

याबाबत कंपनीनं वैमानिक संघटनेशी सर्व स्तरावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु ही चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळं आता वैमानिक संपावर जात असताना १०० टक्के सेवा ठप्प होणार असल्याची माहिती समोर येतं आहे.

दररोज २ उड्डाणं

ब्रिटीश एअरवेजकडून मुंबई-लंडनदरम्यान दररोज २ उड्डाणं आहेत. तसंच, आठवड्यातून ३ उड्डाणं स्वतंत्रपणे असून, मुंबई-लंडन या मार्गावर उडवली जातात. यासाठी बोइंग ७८७-९०० या २९० आसनी व बोइंग ७७७ या ३९६ आसनी विमानांचा वापर केला जातो. तसंच, आठवड्यातून जवळपास ६ हजार प्रवासी मुंबई-लंडन असा प्रवास करतात. त्यामुळं या प्रवाशांचा संपामुळं खोळंबा होणार आहे.


हेही वाचा -

बेस्ट कामगारांना पगारवाढ, उद्धव ठाकरेंची ग्वाही

सरकारी गृहनिर्माण योजनेतून आता एका व्यक्तीला एकच घर



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा