Advertisement

बेस्ट कामगारांना पगारवाढ, उद्धव ठाकरेंची ग्वाही


बेस्ट कामगारांना पगारवाढ, उद्धव ठाकरेंची ग्वाही
SHARES

येत्या काळात बेस्ट कामगारांचा पगार वाढण्याची शक्यता आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ग्वाही दिली असून, 'मुंबईसह देशभरातच नव्हे, तर जगातही मंदीचा फेरा आहे. अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची वेळ आली आहे. अशी स्थिती असतानाही बेस्टच्या कामगारांची नोकरी कायम राहणार असून त्यांना वेतनवाढही दिली जाणार आहे', असं त्यांनी म्हटलं.  

पगारवाढ

कुलाबा येथील बेस्ट भवनाता झालेल्या बेस्ट अॅप आणि इलेक्ट्रिक बसगाड्यांचा लोकार्पण सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी याबाबत ग्वाही दिली आहे. बेस्ट प्रवाशांसाठी 'BEST PRAWAS' हे अत्याधुनिक अॅप बेस्टनं सेवेत आणलं आहे.

आर्थिक मदत

महापालिकेनं बेस्टला कर्ज फेडण्यासाठी आर्थिक मदत केली असली तरी, अद्याप कामगारांच्या वेतनवाढ कराराबाबत कामगार नाराज आहेत. त्यामुळं येत्या काळात कामगारांची पगारवाढ होणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

इलेक्ट्रिक बस सध्या या मार्गांवर

बस क्रमांक
मार्ग
३०२
प्रतीक्षानगर ते मुलुंड
सी-७६
सायन ते दहिसर
सी-४२
सायन ते ददलानी पार्कठाणे
३५२
सायन ते ट्रॉम्बे
६३
चुनाभट्टी ते वसंतराव नाईक चौकताडदेव


इलेक्ट्रिक बसचं वैशिष्ट्यं

  • चार्जिंगसाठी ३ तास अपेक्षित.
  • एका चार्जिंगमध्ये १८०-२०० किमी अंतर.
  • बसमध्ये तीन सीसीटीव्ही.
  • कंट्रोल पॅनेलमध्ये सर्व मार्गांची नोंद.
  • आपत्कालीन स्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्काची व्यवस्था.
  • आरामदायी आसनं.
  • उघडबंद होणारे दरवाजे.
  • प्रवासी क्षमता-३१.



हेही वाचा -

सरकारी गृहनिर्माण योजनेतून आता एका व्यक्तीला एकच घर

बेस्ट कामगारांचा सामंजस्य कराराला नकार, संपावर जाण्याची शक्यता



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा