Advertisement

अनुयांयासाठी बेस्टकडून मुंबई दर्शनाची संधी


अनुयांयासाठी बेस्टकडून मुंबई दर्शनाची संधी
SHARES

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६१व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकार, मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन आणि बेस्ट प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. दरवर्षी शिवाजी पार्क येथे लाखोंच्या संख्येने अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. आता त्यांच्यासाठी बेस्टदेखील उपक्रम राबवत आहे.


अनुयायांसाठी मुंबई दर्शन

बेस्ट उक्रमातर्फे दरवर्षी अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यंदाही बेस्ट प्रशासनाने अनुयायांसाठी मुंबई दर्शनाची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संबधातील स्मृतिस्थळ, वास्तू, बाबासाहेब राहत असलेले घर (राजगृह), ग्रंथालय, आंबेडकर कॉलेज आणि सिद्धार्थ कॉलेज इत्यादी ठिकाणी अनुयायांना जाता येणार आहे. याकरीता प्रतिप्रवास १५० रुपये आकारले जाणार आहेत. सकाळी ८, ८.३०, ९, ९.३० आणि १० वाजता शिवाजी पार्क (सेनापती बापट पुतळा, दादासाहेब रेगे मार्ग) येथून मुंबई दर्शनाच्या फेऱ्यांना सुरुवात होईल.


अनुयायांसाठी दैनंदिन बसपासचे वितरण

४ ते ७ डिसेंबर दरम्यान मुंबईत येणाऱ्या अनुयांयासाठी दैनंदिन बसपासचे वितरण करण्यात येईल. त्यांना मार्गदर्शन करण्याकरता बसवाहक आणि बसनिरीक्षकांची नियुक्ती देखील करण्यात येणार आहे. हा पास शहरी प्रवासाकरता ४० रु., उपनगरीय प्रवासाकरीता ५० रु., संपूर्ण प्रवर्तन क्षेत्राकरता ७० रुपये किंमतीत उपलब्ध असेल. यासाठी शिवाजी पार्क येथे बेस्टचा स्टॉलदेखील बांधण्यात आला आहे.हेही वाचा

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्ट बसगाड्यांची विशेष व्यवस्था

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर डीजे, लाऊडस्पीकरचा गोंगाट नाही!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा