Advertisement

'जेव्हीएलआर मेट्रो स्थानकाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटर नाव द्या'


'जेव्हीएलआर मेट्रो स्थानकाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटर नाव द्या'
SHARES

मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामकरणाचा जोरदार धडका सुरू असतानाच आता जोगेश्वरीतील जेव्हीएलआर मेट्रो स्थानकाच्या नामकरणाचीही मागणी जोर धरू लागली आहे. दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो-7 मार्गातील एक स्थानक जोगेश्वरी, पश्चिम द्रुतगती मार्गालगत येते. मुंबई पालिकेच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरलगत हे स्थानक येत असल्याने या स्थानकाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर नाव द्यावे, अशी मागणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री आणि जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांनी ही मागणी एका पत्राद्वारे एमएमआरडीएकडे केली आहे.

मेट्रो-7 चे काम जोरात सुरू असून या मार्गावर 14 मेट्रो स्थानके असणार आहेत. यातील एक मेट्रो स्थानक जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर सेंटर जवळ असणार आहे. या मेट्रो स्थानकाला जेव्हीएलआर मेट्रो स्थानक असे नाव एमएमआरडीएने प्रस्तावित केले आहे. मात्र या स्थानकाला जेव्हीएलआरऐवजी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ट्रॉमा केअर सेंटर नाव द्यावे, अशी मागणी वायकर मागणी केली आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरील पूर्व-पश्चिम भागांना जोडणाऱ्या दक्षिण उड्डाणपुलाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकाचेही असेच नामकरण करावे, असे वायकर यांनी एमएमआरडीएला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान मोनोरेल दादर पूर्व स्थानकाचे नामकरण विठ्ठल मंदिर करावे अशी मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून वडाळ्यातील रहिवाशांकडून होत आहे. त्यासाठी आंदोलनही केले जात आहे. मात्र एमएमआरडीएने ही मागणी साफ फेटाळून लावली आहे. असे असताना आता राज्यमंत्र्यांची मागणी एमएमआरडीए मान्य करते का, हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल. याबाबत एमएमआरडीए, महानगर आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा