Advertisement

कोरोनावरील औषध संपवण्यासाठी शासनाचं षडयंत्र - नंदकुमार देशमुख

मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यावर सुरूवातीला अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली.

कोरोनावरील औषध संपवण्यासाठी शासनाचं षडयंत्र - नंदकुमार देशमुख
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका प्रशासनानं कंबर कसली आहे. शहरात ठिकठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, असं असलं तरी मुंबईत वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांच खापर हे लोकलवर फोडण्यात येत आहे.

लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीमुळं मुंबईत कोरोना वाढत असल्याचं अनेक राजकीय नेत्याचं म्हणणं आहे. मात्र, 'हे राजकीय मुंबई लोकलला बदनाम करत आहेत', अशी टीका करत इतर सरकारी व खासगी वाहनांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते तेव्हा कोरोना वाढत नाही का? असा सवाल उपनगरीय प्रवासी महासंघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यावर सुरूवातीला अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात म्हणजे १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र, लोकल सुरू केल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढू लागला. कोरोनाच्या घसरलेले आकडे पुन्हा वाढले. परिणामी मुंबई लोकलवर कोरोनाचं खापर फोडण्यात आलं.

'राजकीय नेते हे लोकल सेवेची बदनामी करत आहेत. शिवाय, सध्या कोरोनावर आळा घालण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळं ही लस संपवण्यासाठी व कोरोनावरील औषध संपवण्यासाठी शासनाचं हे षडयंत्र आहे', असं मत उपनगरीय प्रवासी महासंघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं.

गतवर्षी मुंबईसह आसपासच्या परिसरात कोरोनानं शिरकाव केला. तेव्हा अनेक नागरिकांच्या मनात भीती होती, ती म्हणजे दवाखान्यात गेल्यास कोणतीही चाचणी केल्यावर डॉक्टर कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल देत होते. या भीतीमुळं अनेकांनी घरच्या घरी उपचार करण्यास सुरूवात केली. मात्र, वर्ष सरलं तरी नागरिकांच्या मनातली भीती अद्याप गेली नसल्यानं राज्य शासन सर्वसामान्यांचा फायदा घेत आहेत, असंही नंदकुमार देशमुख यांनी म्हटलं. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा