Advertisement

रेल्वेत हरवलेलं सामान ‘असं’ मिळवा, रेल्वेचा नवा उपक्रम

भारतीय रेल्वेनं प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा शोध घेण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे.

रेल्वेत हरवलेलं सामान ‘असं’ मिळवा, रेल्वेचा नवा उपक्रम
SHARES

भारतीय रेल्वेनं प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा शोध घेण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. नवीन उपक्रमांतर्गत, प्रवाशी सहजपणे त्याच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेऊन हरवलेली वस्तू परत मिळवू शकतात.

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) प्रवाशांची तसंच त्यांच्या सामानाची सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. या दिशेनं आरपीएफनं 'मिशन अमानत' सुरू केलं आहे. ज्यामुळे रेल्वे प्रवाशांना त्यांचे हरवलेले सामान परत मिळवणं सोपे झाले आहे.

पश्चिम रेल्वेनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, प्रवाशांना त्यांचे हरवलेले सामान परत मिळणं सोपं व्हावं यासाठी पश्चिम रेल्वेच्या RPF नं पुढाकार घेतला आहे. मिशन अमानत उपक्रमांतर्गत, हरवलेल्या सामानाचा तपशील छायाचित्रांसह पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर पोस्ट केला जातो. प्रवासी मिशन अमानत- RPF वेबसाइट http://wr.indianrailways.gov.in वर पोस्ट केलेल्या चित्रांसह हरवलेल्या सामानाचा तपशील तपासू शकतात.

पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकार्‍यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, २०२१ या वर्षात, जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत, पश्चिम रेल्वे विभागाच्या रेल्वे संरक्षण दलानं एकूण १,३१७ रेल्वे प्रवाशांकडून २.५८ कोटी रुपयांचा माल जप्त केला आणि त्यांना परत केला. पश्चिम रेल्वेचे रेल्वे सुरक्षा दल ऑपरेशन 'मिशन अमानत' अंतर्गत रेल्वे प्रवाशांना ही सेवा देत आहे.

प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास अनुभव देण्यासाठी पश्चिम रेल्वे आरपीएफ चोवीस तास काम करते. RPF ने गुन्ह्यांच्या शोधासाठी प्रतिबंधात्मक उपायांसह देशभरात पसरलेल्या रेल्वेच्या अफाट मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.

दुसर्‍या ट्विटमध्ये, पश्चिम रेल्वेनं म्हटलं आहे की, अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वे नियमित तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत या मोहिमांमधून, अनियमित प्रवाश्यांकडून ६८ कोटी आणि मास्क नसलेल्या केसेसमधून ४१.०९ लाख दंड वसूल करण्यात आला आहे.



हेही वाचा

बेस्ट 'या' प्रवाशांसाठीच युनिव्हर्सल पास सुरू करणार

मुंबईत लवकरच १३४ चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा