अंधेरी - पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकातील प्लॅटफॉर्म आता सरळ एका रांगेत आलेत. चक्रावलात ना? पण तसंच झालंय. याआधी उलट सुलट क्रमांक असलेल्या प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांचा गोंधळ उडत होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने या सर्व प्लॅटफॉर्मचे क्रमांक एका रांगेत करण्याचा निर्णय घेतलाय. रविवारी मध्यरात्रीपासून प्लॅटफॉर्मच्या नवीन क्रमांकाची मालिका कार्यान्वित झाली.
पूर्वी हार्बरचे दोन प्लॅटफॉर्म हे सहा आणि सात क्रमांकाचे ओळखले जात होते. मात्र या रचनेत अंधेरी स्थानकात पश्चिमेकडून आत शिरताना आधी प्लॅटफॉर्म क्रमांक सहा- सात त्यानंतर क्रमांक एक ते पाच आणि त्यानंतर आठ- नऊ असा प्लॅटफॉर्मचा क्रम होता. ही गुतांगुतीची क्रमवारी बदलून पश्चिमेकडून पूर्वेला एक ते नऊ हे सलग क्रमांक प्लॅटफॉर्मना दिले जावेत, असा प्रस्ताव मुबंई विभागाने पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात काही आठवड्यांपूर्वी दिला होता. त्यानुसार हे बदल करण्यात आले आहेत.
जुने प्लॅटफॉर्म क्रमांक (पश्चिमेपासून पूर्वेकडे) | नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक (पश्चिमेपासून पूर्वेकडे) |
6 | 1 |
7 | 2 |
1 | 3 |
2 | 4 |
3 | 5 |
4 | 6 |
5 | 7 |
8 | 8 |
9 | 9 |