Advertisement

१ नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक


१ नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक
SHARES

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. पावसाळी कालावधीत सर्व गाड्यांचा वेग कमी करण्यात आल्याने १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत मान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले होते. आता पावसाळा संपल्याने १ नोव्हेंबरपासून नव्या वेळापत्रकानुसार सर्व गाड्या धावणार आहेत.


'या' गाड्यांचा समावेश

नव्या वेळापत्रकानुसार, सावंतवाडी - दिवा पॅसेंजर सावंतवाडी येथून सकाळी 8.30 ला सुटून दिवा येथे रात्री 8.21 वाजता पोहोचेल. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर दिवा येथून सकाळी 6.25 ला सुटून सावंतवाडीला सायंकाळी 5.50 ला पोहोचेल.


  • मांडवी एक्स्प्रेस अप – सावंतवाडी सकाळी 10.44 ते सीएसटी रात्री 9.40
  • मांडवी एक्स्प्रेस डाऊन – सीएसटी सकाळी 7.10 ते सावंतवाडी दुपारी 4.15
  • जनशताब्दी अप – मडगाव दुपारी 2.30 ते दादर रात्री 11.05
  • जनशताब्दी डाऊन – दादर सकाळी 5.25 ते मडगाव दुपारी 2.05
  • तुतारी एक्स्प्रेस अप – सावंतवाडी संध्याकाळी 6.50 ते दादर सकाळी 6.45
  • तुतारी एक्स्प्रेस डाऊन – दादर दुपारी 12.05 ते सावंतवाडी रात्री 10.40
  • कोकणकन्या अप – सावंतवाडी सकाळी 7.36 ते सीएसटी संध्याकाळी 5.50
  • कोकणकन्या डाऊन - सीएसटी रात्री 11.05 ते सावंतवाडी सकाळी 8.22
  • मंगलोर-मुंबई अप – मडगाव सकाळी 6.40 ते सीएसटी संध्याकाळी 4.25
  • मुंबई-मंगलोर डाऊन – सीएसटी रात्री 10.00 ते मडगाव सकाळी 7.05
  • डबलडेकर अप – मडगाव सकाळी 6.00 ते एलटीटी संध्याकाळी 5.10
  • डबलडेकर डाऊन – एलटीटी सकाळी 5.33 ते मडगाव संध्याकाळी 5.30

 


हेही वाचा -

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूषखबर! १ नोव्हेंबरपासून लोकल फेऱ्यांमध्ये वाढ

१ जानेवारीपासून पश्चिम मार्गावर एसी लोकल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा