Advertisement

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूषखबर! १ नोव्हेंबरपासून लोकल फेऱ्यांमध्ये वाढ


मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूषखबर! १ नोव्हेंबरपासून लोकल फेऱ्यांमध्ये वाढ
SHARES

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवरील प्रवाशांच्या सोयीसाठी लोकलच्या १८ फेऱ्या वाढणार आहेत. येत्या १ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. त्यामध्ये या वाढीव फेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

या वाढीव फेऱ्यांमुळे मध्य रेल्वेवरील मेन लाईनच्या फेऱ्यांची संख्या आता ८३८ वरुन ८५६ झाली आहे. तर मध्य रेल्वेवर दिवसाला धावणाऱ्या लोकल फेऱ्यांची संख्या १६८८ वरुन १७०६ वर गेली आहे.

महत्वाचे म्हणजे दिवा स्थानकात जलद लोकलची संख्या वाढवण्यात आलेली आहे. २४ जलद लोकल गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यात आला होता. त्यामध्ये वाढ होऊन आता ४६ जलद लोकल दिवा स्थानकात थांबणार आहेत.


डाउन मार्गावरील जादा फेऱ्या

फेऱ्या
सुटणार
पोहोचणार
विद्याविहार-टिटवाळा
स. ६.४७ वा
स. ७.५९ वा
सीएसएमटी-कल्याण
स. ९.०५ वा
स. १०.३४ वा
दादर-कल्याण
स. १०.०९ वा
स. ११.१० वा
दादर-कल्याण    
दु. ३.०० वा  
दु. ४.०९ वा
विद्याविहार-कल्याण    
संध्या. ५.३० वा
संध्या. ६.३० वा
विद्याविहार-कल्याण
संध्या. ६.१५ वा
संध्या. ७.१२ वा
ठाणे-कल्याण
संध्या ७.२५ वा
संध्या. ७.५८ वा
दादर-डोंबिवली
दु. १२.२० वा
दु. १.२२ वा
दादर-डोंबिवली
दु. १२.३७ वा
दु. १.३९ वा
दादर-डोंबिवली
दु. १.४३ वा
दु. २.४५ वा
सीएसएमटी-कुर्ला        
रात्री १२.३१ वा
रात्री १ वा
सीएसएमटी-कुर्ला        
स. ११.०८ वा
स. ११.३६ वा
दादर-बदलापूर
रात्री ११.१८ वा  
रात्री १२.४८ वा


अप मार्गावरील जादा फेऱ्या 


फेऱ्या
  सुटणार
पोहोचणार
टिटवाळा-दादर  
स. ८.१० वा      
स. ९.३७ वा (कल्याण दिशेचे तीन डब्बे महिलांसाठी राखीव)
बदलापूर-दादर
स. ८.४५  वा
स. ९.५५ वा (कल्याण दिशेचे तीन डब्बे महिलांसाठी राखीव)
खोपोली-कर्जत
प. ५.१०  वा
प. ५.५३ वा
कर्जत-सीएसएमटी
संध्या. ५.५६ वा
संध्या. ७.५२ वा
कल्याण-दादर  
स. १०.४५ वा
स. ११.५४ वा
कल्याण-दादर      
स.११.१७ वा      
दु. १२.२८ वा
कल्याण-ठाणे
दु. ४.३८ वा    
संध्या. ५.११ वा
कल्याण-ठाणे  
संध्या. ६.१० वा
संध्या. ६.४१ वा
डोबिंवली-सीएसएमटी  
दु. १.३२ वा
दु. २.५१ वा
डोबिंवली-दादर
दु. १.४८ वा
दु. २.४९ वा
डोंबिवली-सीएसएमटी
दु. २.५८ वा
दु. ४.१७ वा
आसनगाव-ठाणे
रात्री ११.०८ वा
रात्री १२.१५ वा


या गाड्या रद्द

कुर्ला-अंबरनाथ पहाटे ४.४४ वा, सीएसएमटी-अंबरनाथ स. ७.०५ वा, अंबरनाथ-सीएसएमटी रात्री ८.२९ वा, टिटवाळा-आसनगाव पहाटे ५.०५ वा, टिटवाळा-कुर्ला रात्री ११.४६ वा, आसनगाव-कल्याण रात्री ११.३२ वा, सीएसएमटी-टिटवाळा रात्री १०.२० वाजता सुटणाऱ्या या गाड्या १ नोव्हेंबरपासून रद्द करण्यात आलेल्या आहेत.


या फेऱ्यांचा विस्तार


सध्याची लोकल        
वेळ
 १ नोव्हेंबरपासून
वेळ
कल्याण-सीएसएमटी
प. ५.२१ वा
टिटवाळा-सीएसएमटी
प. ५.०५ वा
आसनगाव-सीएसएमटी
प. ५.३३ वा        
कसारा-सीएसएमटी
प. ५  वा
सीएसएमटी-टिटवाळा
रा. ९.३७ वा    
सीएसएमटी - कसारा
रा. ९.३२ वा
कसारा-ठाणे
संध्या. ५ वा        
कसारा-सीएसएमटी
संध्या. ५.१७ वा
कर्जत-ठाणे
स. १०.३५ वा      
कर्जत-सीएसएमटी
स. १०.४५ वा
सीएसएमटी-बदलापूर  
दु. ३.५३ वा  
सीएसएमटी-कर्जत
दु. ३.५३ वा
दादर-कल्याण
दु. ४.१३ वा
दादर-बदलापुर  
दु. ४.१३ वा
सीएसएमटी-कर्जत    
रा. १०.३१ वा  
सीएसएमटी-खोपोली
रा. १०.२८ वा
सीएसएमटी-कर्जत
रा. ११.१८ वा  
सीएसएमटी-खोपोली
रा. ११.१८ वा
बदलापुर-ठाणे
रात्री ८.२६ वा  
बदलापुर-सीएसएमटी
रा. ८.२४ वा
दादर-कल्याण
रा. १०.५२ वा
दादर-अंबरनाथ
रा. १२.१५ वा


या लोकलच्या वेळेत बदल


गाड्यासध्याची वेळ    
बदलण्यात आलेली वेळ
सीएसएमटी-कर्जत
रा. १२.३० वा  
रा. १२.२० वा
सीएसएमटी-बदलापुर
स. ७.२५ वा
स. ८.२९ वा
सीएसएमटी-खोपोली
स. ७.५३ वा  
स. ७.३० वा
सीएसएमटी - कर्जत
स. ८.२९ वा
स. ८.१६ वा
सीएसएमटी - कर्जत
स. ९.०८ वा    
स. ९.०१ वा
कसारा-सीएसएमटी
रा. १०.३५ वा  
रा. १०.०५ वा
बदलापुर-सीएसएमटी
रा. ११.५० वा      
रा. ११.३१ वा

                                               

डाउन मार्गावरील शेवटच्या लोकल

सीएसएमटी-ठाणे -  रा. १२.३१ वा

कुर्ला-ठाणे -  रा. १२.५६ वा

ठाणे-कल्याण  -  रा. १.१९ वा

कल्याण-कर्जत  -  रा. १.५२ वा


अप मार्गावरील पहिली लोकल

कसारा-आसनगाव  -   रा. १०.०५ वा

आसनगाव-टिटवाळा  -  रा. ११.०८ वा

टिटवाळा-कल्याण  -   रा. ११.२९ वा

बदलापुर-कल्याण  -  रा. ११.३१ वा

कल्याण-सीएसएमटी  -  रा. ११.५२ वा



हेही वाचा

१ जानेवारीपासून पश्चिम मार्गावर एसी लोकल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा