Advertisement

आता मुंबईत 'नो हॉर्न डे'


आता मुंबईत 'नो हॉर्न डे'
SHARES

रस्त्यावर वाहतूककोंडी असो वा नसो एखादा वाहनचालक हाॅर्न न वाजवता शांतपणे पुढे निघून गेलाय, असं चित्र मुंबईच्या रस्त्यांवर क्वचितच दिसतं. उलट ना ना तऱ्हेचे कर्णकर्कश्श हाॅर्न वाहनांना लावून बिनधास्तपणे ध्वनी प्रदूषण करण्याची मजा लुटतानाच अनेकजण दिसून येतात. अशा प्रकारांना लगाम घालून त्यांच्यात वाहतूक शिस्त आणण्यासाठी गृहराज्यमंत्री (शहरे) डाॅ. रणजीत पाटील यांन मुंबईत 'नो हाॅर्न डे' उपक्रम सुरू केला अाहे.


कुणाला त्रास?

कर्णकर्कश्श हाॅर्नमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास प्रामुख्याने वयोवृद्ध, लहान मुले, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना प्रचंड प्रमाणात होतो. त्यांच्या आरोग्यावरही या ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम होतात. अनेकदा अचानक हाॅर्न वाजल्याने अपघातही घडतात. या अनपेक्षित घटना टाळण्याच्या उद्देशाने डॉ. पाटील यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.


कारवाई आणि आवाहन

मुंबईतील परिवहन विभागाने या उपक्रमाच्या अंमलबजावणीला सुरूवात केली असून एखादा वाहनचालक मोठ्या आवजात हाॅर्न वाजताना दिसल्यास त्याच्यावर कारवाई केली जात आहे. एवढंच नव्हे, तर रस्त्यात जागोजागी उभे राहून स्वतः वाहतूक नियंत्रण अधिकारी वाहनचालकांना हॉर्न बंदीचं पत्रके देत जनजागृती करत आहेत.

डॉ. पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहनचालकांना हॉर्न बंदीचं पत्रक वाटून वाहनचालकांनी या उपक्रमाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा