Advertisement

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! वेटिंग लिस्टची कटकट लवकरच संपणार

रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे चालवण्याच्या एका योजनेवर काम करत असून यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधील प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्टची कटकट कायमची मिटणार आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! वेटिंग लिस्टची कटकट लवकरच संपणार
SHARES

रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे चालवण्याच्या एका योजनेवर काम करत असून यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधील प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्टची कटकट कायमची मिटणार आहे. रेल्वेने 'व्हिजन २०२४' हे लक्ष्य ठरवलं असून ज्यात रेल्वेचे नुकसान कमी करून महसूल वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यानुसार २०२४ पर्यंत ही योजना प्रत्यक्षात आणण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.

महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात दसरा-दिवाळी, गणेशोत्सव, छट पूजा, बैसाखी, ओनम इ. सणांमध्ये तसंच उन्हाळी सुट्टी, हिवाळ्याच्या मोसमात मोठ्या संख्येने प्रवासी घराबाहेर पडतात. रेल्वेच्या तिकीटासाठी काही महिन्यांअगोदरच बुकींग करावं लागतं. बऱ्याचदा वेटिंग लिस्टमधील तिकीट कन्फर्म कधी होईल, याची वाट बघावी लागते. परंतु मागणीनुसार रेल्वे चालवल्यास सर्व प्रवाशांना जागा उपलब्ध होऊ शकतील. 

हेही वाचा- मोनो रेल्वेच्या २ गाड्यांची पुर्नबांधणी, पुढच्या आठवड्यापासून धावणार ७ ट्रेन

प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे चालवल्यास रेल्वे प्रशासनाला पूर्ण उत्पन्न मिळेल. सोबतच प्रतीक्षा यादीची आवश्यकता देखील उरणार नाही. 'मागणीनुसार रेल्वे' गाड्यांचं नियोजन कसं करायचं, याचा सध्या रेल्वे बोर्डाकडून विचार सुरु आहे. सोबतच रेल्वे व्हिजननुसार २०२४ पर्यंत माल वाहतूक २०२४ दशलक्ष टनापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. २०१९ मध्ये रेलवेकडून १२१० दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली होती. रेल्वे व्हिजन २०२४ साठी २.९ लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे, असं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के यादव यांनी सांगितलं. पुढील महिनाभरात या योजनेला मंजुरी मिळू शकते, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

कोरोनामुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असल्याने आतापर्यंत ४६०० कोटींचा महसूल मिळाला आहे. तर एकूण १५ हजार कोटींचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. या तुलनेत गेल्या वर्षी प्रवासी वाहतुकीतून रेल्वे प्रशासनाला ५३ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.  

(no more waiting list as per indian railways vision 2024 for mail and express train)

हेही वाचा- मध्य रेल्वेवरील AC लोकलला पहिल्याच दिवशी अत्यल्प प्रतिसाद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा