Advertisement

मोनो रेल्वेच्या २ गाड्यांची पुर्नबांधणी, पुढच्या आठवड्यापासून धावणार ७ ट्रेन

मोनोच्या दोन गाडय़ांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पुनर्बाधणी करण्यात आली आहे.

मोनो रेल्वेच्या २ गाड्यांची पुर्नबांधणी, पुढच्या आठवड्यापासून धावणार ७ ट्रेन
SHARES

मोनोच्या दोन गाडय़ांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (MMRDA) कडून पुनर्बाधणी करण्यात आली आहे. त्यापैकी एका गाडीला एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी वडाळा स्थानकात हिरवा झेंडा दाखवला. तर दुसरी मोनो पुढील आठवडय़ात होईल. दोन रेल्वे गाडय़ा पुन्हा कार्यरत करण्यासाठी आठ कोटी रुपये खर्च आला.

मोनो रेल्वेचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा २०१४ मध्ये, तर वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा दुसरा टप्पा २०१९ मध्ये कार्यरत झाला. सुरुवातीस मोनोचे संचालन स्कोमी या कंपनीकडे होते, तेव्हा दहा रेल्वे गाडय़ा उपलब्ध होत्या. स्कोमी कंपनी दिवाळीखोरीत गेल्यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये एमएमआरडीएनं मोनोचे संचालन स्वत:कडे घेतले, तेव्हा केवळ पाचच रेल्वे गाडय़ा वापरण्यायोग्य राहिल्या.

स्कोमी कंपनीकडून सुट्या भागांचा योग्य तो साठा केला जात नसल्यानं सुरुवातीच्या दहापैकी दोन गाडय़ांचे सुटे भाग काढून स्कोमीनं इतर गाडय़ांसाठी वापरले. तसंच एक गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. परिणामी तीन गाडय़ा निकामी असल्याची माहिती राजीव यांनी दिली. तसंच सुट्या भागांची कमतरता असल्यानं अन्य दोन गाड्या वापरणं कठीण झालं.

मोनोसाठी देशांतर्गत उत्पादकांनाच सुटे भाग तयार करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. त्यातून तब्बल २३० सुटे भाग मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि बंगळूरु इथल्या उत्पादकांकडून तयार करण्यात आले. सुटे भाग देशांतर्गतच तयार केल्यामुळे परदेशातून निर्यात करताना होणाऱ्या खर्चात ७४ टक्क्यांची बचत झाली.

मार्च २०१९ मध्ये दुसरा टप्पा कार्यरत झाल्यावर रेल्वे गाडय़ांच्या कमतरतेमुळे फेऱ्यांची वारंवारिता कमी होऊन दोन गाडय़ांमध्ये ३५ ते ४० मिनिटांचे अंतर राहू लागले. परिणामी मोनोवरील प्रवाशांची संख्याही घटली.

एकूण प्रवाशांपैकी वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या टप्प्यात दोनतृतीयांश प्रवासी मोनोवर प्रवास करतात, तर वडाळा ते चेंबूर टप्प्यात उर्वरित. त्यामुळे पुढील काही दिवसांत वडाळा ते चेंबूर मार्गावर दोन, तर दुसऱ्या टप्प्यात चार रेल्वे गाडय़ाकार्यरत असतील. त्यामुळे फेऱ्यांची वारंवारिता १८ मिनिटांवर येऊन प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

मध्ये रेल्वेवरील AC लोकलला पहिल्याच दिवशी अत्यल्प प्रतिसाद

ठाण्यात टोईंगधाडकांसाठी नवे नियम लागू

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा