Advertisement

ठाण्यात टोईंगधाडकांसाठी नवे नियम लागू

वाहनधारक आणि टोईंग ऑपरेटर यांच्यात अनेकदा वाद झालेले दिसून येतात. अनेकदा गाड्यांचे नुकसान झाल्याची तक्रारही केली जाते. यासाठी हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

ठाण्यात टोईंगधाडकांसाठी नवे नियम लागू
SHARES

ठाण्यात टोईंगसाठी आता नवीन नियम लागू झाले आहेत. त्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. १ जानेवारीपासून यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. वाहनधारक आणि टोईंग ऑपरेटर यांच्यात अनेकदा वाद झालेले दिसून येतात. अनेकदा गाड्यांचे नुकसान झाल्याची तक्रारही केली जाते. यासाठी हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

दुचाक्यांविरोधात केल्या जाणाऱ्या ‘टोईंग’च्या कारवाईत शिस्त आणण्याचा निर्णय ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेनं घेतला आहे. गाडी उचलत असता उद्घोषणा आणि संपूर्ण व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

टोईंग कंत्राटदारा समवेतच्या करारात नमूद असलेल्या सर्व अटींचे काटेकोर पालन करण्याची ठाम भूमिका वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे आता वाहन उचलून नेण्यापूर्वी टोईंगच्या गाडीतून अनाऊंसमेंट केली जाणार आहे.

तसंच उचललेल्या वाहनाच्या जागी वाहतूक शाखेचा स्टीकर लावण्यात येणार असून या स्टीकरवर संबंधित वाहतूक चौकीचे नाव आणइ दूरध्वनी क्रमांक असणार आहे. यामुळे वाहनधारकाला आपले वाहन नेमके कुठल्या वाहतूक चौकीवर नेण्यात आले आहे, याबाबत संभ्रम राहाणार नाही. तसंच, या संपूर्ण कारवाईचे व्हिडीओ चित्रिकरणही करण्यात येणार आहे.

यापूर्वी वाहनचालक जागेवर उपस्थित असला तरी वाहन उचलून नेले जाते, वाहन नेल्यानंतर खडूने त्याजागी सांकेतिक भाषेत लिहिले जाते. ती भाषा वाहनचालकाच्या परिचयाची नसल्यामुळे आपले वाहन नेमके कुठे नेले आहे, याचा थांगपत्ता वाहनचालकाला लागत नाही. तसंच अनेकदा हे खडूचे मार्किंग पुसले गेल्यामुळे वाहन चोरीला गेले की, वाहतूक पोलिसांनी उचलून नेले, याबाबतही संभ्रम निर्माण होऊन वाहनचालक सैरभैर होतात.

वाहन उचलण्यापूर्वी जाहीर अनाऊंसमेंट करून संबंधित वाहनचालकाला आपले वाहन उचलण्यासाठी काही अवधी दिला जाईल. त्या अवधीत वाहनचालकानं येऊन वाहन हलवल्यास त्याच्याकडून केवळ नो पार्किंगच्या दंडाची रक्कम घेतली जाईल, टोईंग चार्जेस घेतले जाणार नाहीत. मात्र, वाहनचालक त्या अवधित न आल्यास वाहन उचलून चौकीवर आणले जाईल.



हेही वाचा

'इ-चलान' दंड भरा; अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द!

एसटी महामंडळाच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा