Advertisement

'मुंबई दर्शन'साठी नवीन ओपन डेक असलेल्या बस बेस्ट खरेदी करणार

सध्या या बसमधून पर्यटकांना दक्षिण मुंबईतील पर्यटनस्थळांचा आनंद लुटता येतो.

'मुंबई दर्शन'साठी नवीन ओपन डेक असलेल्या बस बेस्ट खरेदी करणार
SHARES

पर्यटकांसाठी आकर्षण असलेली आणि मुंबई दर्शन घडवणारी बेस्टच्या ताफ्यातील शेवटची ओपन डेक बस आयुर्मान संपल्याने येत्या ऑक्टोबरमध्ये सेवेतून हद्दपार होणार आहे.

मात्र प्रवाशांचा मिळणाऱ्या चांगल्या प्रतिसादामुळे नवीन डबल डेकर ओपन डेक बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे.

ही खरेदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुंबई बस सेवा खंडीत होऊ नये, यासाठी एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बस मुंबई दर्शनाकरीता चालवण्यात येणार असल्याचे उपक्रमाकडून सांगण्यात आले.

बेस्ट उपक्रमाने एमटीडीसीच्या मदतीने २६ जानेवारी, १९९७ रोजी ओपन डेक बस सुरू केली. या बसमध्ये अप्पर डेक आणि लोअर डेक असे प्रकार आहेत.

सध्या या बसमधून पर्यटकांना दक्षिण मुंबईतील पर्यटनस्थळांचा आनंद लुटता येतो. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात तीन ओपन डेक बस असून, यातील शेवटची बस आयुर्मान संपल्याने ५ ऑक्टोबरला मोडीत काढली जाणार आहे.

एका बसचे आयुर्मान हे साधारण पंधरा वर्षे असते. शेवटची बस सेवेतून हद्दपार होणार असल्याने आणि भाडेतत्त्वावर ५० एसी डबल डेकर पर्यटन बसचीही निविदा रद्द करण्यात आली.

यासंदर्भात बेस्ट उपक्रमाने माहिती देताना ओपन डेक बसला पर्यटकांचा मिळणारा प्रतिसाद आणि वेगळा अनुभव पाहता नवीन डबल डेकर ‘ओपन डेक’ बसगाड्या खरेदी केल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती उपक्रमाने दिली.

खरेदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ताफ्यातील डबल डेकर एसी बसगाड्या मुंबई दर्शनसाठी चालवण्यात येणार आहेत.

सोमवार ते शुक्रवार या दिवशी तीन एसी डबल डेकर बस आणि शनिवार, रविवारी या दिवशी पाच एसी डबल डेकर बस पर्यटकांसाठी चालवण्यात येणार असल्याचे उपक्रमाकडून सांगण्यात आले.



हेही वाचा

'मुंबई दर्शन' बस 5 ऑक्टोबरपासून बंद

जादा शुल्क आकारणाऱ्या बसचालकांविरोधात तक्रार करा, व्हॉट्सअॅप क्रमांक जारी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा