Advertisement

जादा शुल्क आकारणाऱ्या बसचालकांविरोधात तक्रार करा, व्हॉट्सअॅप क्रमांक जारी

नवी मुंबई आरटीओचा पुढाकार

जादा शुल्क आकारणाऱ्या बसचालकांविरोधात तक्रार करा, व्हॉट्सअॅप क्रमांक जारी
SHARES

प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), नवी मुंबई गणेशोत्सवादरम्यान जादा भाडे आकारणाऱ्या बसचालकांवर कडक कारवाई करणार आहे. आरटीओने खाजगी बसचालकांनी निर्धारित भाडे जास्त आकारल्यास त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉट्सअॅप हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.

गणेशोत्सवादरम्यान, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील लोक मोठ्या संख्येने कोकण विभागातील त्यांच्या गावी जाऊन उत्सव साजरा करतात. यातील अनेकांना वेळेवर तिकीट बुक करता येत नसल्याने आणि राज्य परिवहनच्या बसेसमध्ये जागा उपलब्ध नसल्याने लोकांना खासगी बसवर अवलंबून राहावे लागते. 

संधीचा फायदा घेत खासगी बसचालकांनी अनेकवेळा बस भाडेवाढ केल्याचे यापूर्वी निदर्शनास आले होते.

आरटीओ प्रवाशांचा प्रवास सुरळीत करण्यासाठी व्हॉट्सअॅप हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यासह अनेक उपाययोजना राबवत आहे.

वाशी आरटीओच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “समस्या दूर करण्यासाठी आणि उत्सवादरम्यान प्रवाशांकडून अधिकचे  भाडे आकारले जाणार नाही याची खात्री करण्यासाठी, नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सकारात्मक पुढाकार घेतला आहे.” 

वाशीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “गौरी-गणपती सणाच्या काळात अचानक वाढीव बससेवांची मागणी वाढते. राज्य परिवहन अतिरिक्त सेवा चालवत असूनही, अनेक प्रवाशांना तिकीट मिळू शकले नाही,” ती म्हणाली.

885078364 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर परिवहन विभागाला संदेश पाठवून प्रवासी त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात.

लोकांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी परिवहन विभाग या क्रमांकावर आलेल्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करेल.



हेही वाचा

गुड न्यूज! मोरा ते मुंबई जलमार्गाच्या तिकिट दरात कपात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा