प्रवांशाना रेल्वे आरक्षित करताना आपली सीट निवडता येणार

  Mumbai
  प्रवांशाना रेल्वे आरक्षित करताना आपली सीट निवडता येणार
  मुंबई  -  

  रेल्वेचं तिकीट काढणे प्रवाशांसाठी एक डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ऑनलाइन तिकीट काढणे आणखी सोपे केले आहे. चित्रपटगृहात आणि विमानात ज्या पद्धतीने जागांचे आरक्षण होते, त्याच पद्धतीने रेल्वेगाड्यांमध्ये जागांचे आरक्षण व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नवीन सॉफ्टवेअर तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना त्यांच्या आवडीप्रमाणे आरक्षित जागेची निवड करता येणार आहे. 

  रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनंतर तिकीट आरक्षित प्रणालीमध्ये आणखी बदल केले जाणार आहेत. त्यामुळे आयआरसीटीसीच्या ऑनलाइन तिकीट आरक्षण प्रणालीमध्ये लवकरच आमूलाग्र बदल होणार आहेत. रेल्वे तिकीट आरक्षणाची जबाबदारी क्रिस यंत्रणेकडे आहे. नेक्स्ट जनरेशन सॉफ्टवेअर कसे असेल, यासाठी प्रत्येक आठवड्यात रेल्वे अधिकाऱ्यांनी बैठक होत आहे. तसेच नेक्स्ट जनरेशन सॉफ्टवेअरची ब्लू प्रिंट तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही ब्लू प्रिंट तयार होताच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दाखवली जाईल. प्रभू यांची मंजुरी मिळाल्यानंतर नवी तिकीट आरक्षण प्रणाली सुरू करण्यात येईल. त्यानतंर हे सॉफ्टवेअर प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

  या नव्या सॉफ्टवेअरमुळे प्रवाशांच्या समस्या संपणार आहेत. हे सॉफ्टवेअर तयार झाल्यानंतर त्याची चाचणी घेण्यात येईल. ही सुविधा प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.