ओला-उबेर टॅक्सीचालक आक्रमक

 Azad Maidan
ओला-उबेर टॅक्सीचालक आक्रमक

सीएसटी - ओला उबेर कंपनीच्या विरोधात आता ओला उबेर टॅक्सी चालक-मालक आक्रमक झाले आहेत. कंपन्यांनी केलेल्या फसवणुकीविरोधात उबेर टॅक्सी चालकांनी गेल्या आठवड्यापासून आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी टॅक्सी चालक-मालकांनी थेट आजाद मैदानावर आंदोलन केले. टॅक्सी सेवा बंद असून या आंदोलनानंतरही आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याची माहिती टॅक्सी चालक के. के. तिवारी यांनी दिली आहे. 

दरम्यान, काही टॅक्सी गेल्या आठवड्यापासूनच बेमुदत संपावर गेल्या आहेत. तर हे आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ज्या ओला उबेर आंदोलनात सहभागी झाल्या नाहीत, त्यांच्या विरोधातही टॅक्सी चालक-मालकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. आंदोलनाला पाठिंबा न देणाऱ्या गाडया फोडू, असा इशाराच टॅक्सी चालक-मालकांनी दिला आहे. आत्तापर्यंत शांततेत हे आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनानंतरही कंपन्या जर लक्ष देत नसतील तर आता आक्रमक होण्याची वेळ आल्याचे तिवारी म्हणाले.

Loading Comments