Advertisement

घरातून बाहेर पडण्याआधी जरा इकडे बघा !


SHARES

मुंबई - ओला, उबेर या खासगी कंपनीने आपली फसवणूक केल्याचे म्हणत ओला, उबेर टॅक्सी सेवा बंद ठेवत टॅक्सी मालक चालक शुक्रवारी रस्त्यावर उतरले आहेत. चकाला येथील ओला कार्यालयाजवळ चालकांंनी जोरदार घोषणाबाजी केली. ओला कंपनीकडून सारकात्मक तोडगा न निघाल्याने 14 मार्चला आझाद मैदानावर धडकण्याचा इशारा टॅक्सी चालक मालकांनी दिला आहे. तर तोडगा न निघाल्याने काही मालक चालकांनी संप असाच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही टॅक्सी चालकांनी कर्जाचा हप्ता आणि घर चालण्यासाठी शनिवारपासून टॅक्सी रस्त्यावर उतरवणार असल्याचे सांगितले आहे.

ओला, उबेर या खासगी कंपन्यांची मनमानी, बेसुमार दंडवसुली आणि टॅक्सीचालकांना होणार तोटा या सर्व पार्श्वभूमीवर ओला, उबेर टॅक्सीचालकांनी बेमुदत बंदाची हाक दिली आहे.

ओला, उबेर टॅक्सीमधून भरमसाठ नफा मिळेल, या आमिषाला भुलुन अनेक टॅक्सीचालकांनी कर्ज काढत टॅक्सी घेतल्या. पण कंपन्यांच्या आमिषाला भुललेल्या टॅक्सीचालकांना आजच्या घडीला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. कंपन्या वेगवेगळ्या नावाखाली टॅक्सीचालकांकडून दंड आकारत असून टॅक्सीतून इंधन आणि कर्ज यांचा हप्त्याचा खर्चही भागत नसल्याने टॅक्सीचालक मोठ्या अडचणीत अडकले आहेत. याविषयी कंपन्यांकडे दाद मागूनही कंपन्या टॅक्सीचालकांचे काहीच ऐकून घेत नसल्याने आता टॅक्सीचालकांना बेमुदत संपाचे हत्यार काढल्याचं टॅक्सीचालक के. के. मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे.

तसंच जोपर्यत कंपन्या आपल्या मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत हा संप चालूच राहिल असेही मिश्रा यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा