Advertisement

दोन वर्षांत उभारणार १२५ पादचारी पूल

एल्फिन्स्टनसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरीता जीर्ण पूल पाडून नवे पूल उभारण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत येत्या दोन वर्षांत उपनगरीय रेल्वे मार्गावर १२५ पादचारी पूलांचं बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे.

दोन वर्षांत उभारणार १२५ पादचारी पूल
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन स्थानकातील पादचारी पुलावर २९ सप्टेंबर २०१७ रोजी मोठी दुर्घटना झाली होती. या दुर्धटनेमध्ये ३३ जण गंभीर जखमी झाले होते, तर २२ जणांचा मृत्यू आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर मागील वर्षी अंधेरी स्थानकातील गोखले उड्डाणपुलाची पादचारी मार्गिका कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनांनंतर जाग्या झालेल्या रेल्वे प्रशासनानं मुंबईसह उपनगरातील जुन्या पुलांची तपासणी केली होती. एल्फिन्स्टनसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरीता जीर्ण पूल पाडून नवे पूल उभारण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत येत्या दोन वर्षांत उपनगरीय रेल्वे मार्गावर १२५ पादचारी पूलांचं बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे.


पुलांच्या निधीची तरतूद

केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल व पादचारी पुलांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरील ४२ पुलांच्या दुरुस्तीसाठी व नवीन पुलांच्या उभारणीसाठी १०० कोटी ८७ लाख रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. तसंच, मध्य रेल्वे मार्गावरील पुलांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी ९० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.


१२५ पूल उभारणार

रेल्वे मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकातील माहितीनुसार २०१९ या वर्षातील डिसेंबर महिन्यापर्यंत ७० पुलांचं, तर जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत ५५ पुलांचं काम करण्यात येणार आहे. याशिवाय काही स्थानकांत नवीन पूलही उभारण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे.



हेही वाचा -  

दादर स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र

मुंबई विमानतळ तीन दिवस सहा तासांसाठी बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा