मुंबई विमानतळावरील एक रनवे बंद, २३०हून अधिक विमान सेवा रद्द

मंगळवार, बुधवार आणि शनिवार असे तीन सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत धावपट्टी बंद ठेवण्यात येणार आहे.

SHARE

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामासाठी ३० मार्चपर्यंत दर आठवड्यातील ३ दिवस धावपट्टी बंद ठेवण्यात येणार आहे. मंगळवार, बुधवार आणि शनिवार असे तीन सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत धावपट्टी बंद ठेवण्यात येणार आहे.


विमान सेवा रद्द

विमानतळावरील धावपट्टीचे काम ३० मार्चपर्यंत टप्प्याटप्यात करण्यात येणार आहे. मुंबई विमानतळावर दोन धावपट्टया असून या धावपट्टयांवर दररोजच्या विमानाच्या उड्डाण आणि लँडिंगमुळे मोठया प्रमाणात ताण पडतो. त्यामुळे त्यांची देखभाल आणि दुरुस्तीचं काम करण्यात येत आहे. या विमानतळावरून दररोज ९५० विमानासेवा सुरू असतात. मात्र, या कामासाठी प्रत्येक दिवशी २३० विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.


मार्चमध्ये होणार वाहतूक पूर्ववत

तीन दिवस विमानाचं उड्डाण तसंच लँडिंग होणार नसून २१ मार्चनंतर वाहतूक पूर्ववत होणार आहे. दरम्यान, धावपट्टी बंद होण्याआधी आणि सांयकाळी पाचनंतरही विमानसेवा उशिरानेच धावणार आहेत. परंतु, २१ मार्च रोजी हे विमानतळ पूर्ण दिवस सुरू राहणार आहे. ३० मार्चपर्यंत करण्यात येणाऱ्या धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामासाठी प्रवाशांना मोठया त्रासाला समोर जावं लागणार आहे.


हेही वाचा

विमानतळ खासगीकराविरोधात लवकरच मुंबईतील ९६ टक्के विमानतळ कर्मचारी संपावर?

ओला-उबर सेवा बेकायदेशीर, चालक संपावर जाण्याची शक्यतासंबंधित विषय
ताज्या बातम्या