Advertisement

एका आठवड्यात विमानतळावर झाली १ हजार ५६५ प्रवाशांची कोरोना चाचणी

आतापर्यंत विमानतळावर येणाऱ्या केवळ १ हजार ५६५ स्थानिक प्रवाशांची चाचणी घेण्यात आली आहे.

एका आठवड्यात विमानतळावर झाली १ हजार ५६५ प्रवाशांची कोरोना चाचणी
SHARES

दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात इथून जाणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्याची घोषणा करून महाराष्ट्र सरकारला एक आठवडा झाला आहे. अहवालानुसार, आतापर्यंत विमानतळावर येणाऱ्या केवळ १ हजार ५६५ स्थानिक प्रवाशांची चाचणी घेण्यात आली आहे.

२५ नोव्हेंबर २०२० रोजी हे नियम लागू करण्यात आले होते. शिवाय, राज्य सरकारच्या नवीन सूचनांनुसार २ नोव्हेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA)नं COVID 19 चा नकारात्मक अहवाल न घेता वेगवेगळ्या राज्यातून येणार्‍या स्थानिक प्रवाशांसाठी विमानतळाच्या आत एक समर्पित क्षेत्र तयार केले आहे.

या अहवालानुसार, निर्देश अंमलात येण्याच्या पहिल्याच दिवशी १२० प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आली. विमानतळ प्रशासनानं स्पष्ट केलं की, मुंबई विमानतळातून बाहेर पडणाऱ्या या प्रवाशांनाच त्याचा चाचणी अहवाल देणं आवश्यक आहे. मुंबई विमानतळावरून जाणाऱ्यांची चाचणी घेण्यात येणार नाही.

महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांना नकारात्मक कोविड १९ चा अहवाल द्यावा लागतो. त्यांच्याकडे नसल्यास त्यांना विमानतळावर स्वखर्चानं आरटी-पीसीआर चाचणी घ्यावी लागेल. विमानतळ प्राधिकरणानं सांगितलं की, विमानतळातून बाहेर पडण्यापूर्वी प्रवाशांना बॅग कॅरोझल जवळील चाचणी क्षेत्रात निर्देशित केलं जाऊ शकतं.

यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) प्राधिकरणानं घोषित केलं की, विमानतळावर आगमन आणि COVID 19 चाचणी घेणाऱ्या प्रवाशांना चाचणी अहवालाची प्रतिक्षा करताना अन्न आणि मोफत वायफाय सेवा मिळतील.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा