Advertisement

बेस्टच्या 'त्या' बसगाड्यांमध्ये आता वाहकही कंत्राटी तत्वावर

बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्वावरील ४०० सीएनजी विना वातानुकूलित एकमजली बसगाड्या आणल्या जाणार असून पहिल्या टप्प्यातील सुमारे १०० बसगाड्या सप्टेंबर २०२१ पर्यंत दाखल होणार आहेत.

बेस्टच्या 'त्या' बसगाड्यांमध्ये आता वाहकही कंत्राटी तत्वावर
SHARES

बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्वावरील ४०० सीएनजी विना वातानुकूलित एकमजली बसगाड्या आणल्या जाणार असून पहिल्या टप्प्यातील सुमारे १०० बसगाड्या सप्टेंबर २०२१ पर्यंत दाखल होणार आहेत. भाडेतत्वावरील या सर्व बसगाड्यांवर चालकाबरोबरच आता वाहकही कंत्राटदाराचा असेल. पुढील २-३ वर्षांत आपल्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या ६ हजारांवर नेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमानं घेतला आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात ३,३२३ बसगाड्या असून यात भाडेतत्त्वावरील १,१०० बसगाड्यांचा त्यात समावेश आहे.

सध्या ताफ्यात असलेल्या भाडेतत्वावरील बसगाड्यांवर चालक कंत्राटदाराचा व वाहक बेस्टचा होता. मात्र, नव्याने घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत कामगार संघटनांमध्ये नाराजी आहे. प्रवाशांना अपुरी पडणारी सेवा पाहता उपक्रमाने आणखी ४०० भाडेतत्वावरील विना वातानुकूलित सीएनजी बस दाखल करण्याचा निर्णय घेतला.

त्या प्रस्तावाला जानेवारी २०२१ मध्ये बेस्ट समितीने मंजुरी दिली होती. एका कं पनीकडून प्रति किलोमीटर ८९ रुपये ९१ पैसे या दराने १० वर्षांकरीता भाडेतत्वावर या बसगाड्या घेण्यात येणार आहेत. त्यासाठी बेस्ट उपक्रम १० वर्षांसाठी तब्बल १ हजार ९४२ कोटी रुपये रक्कम मोजणार आहे. ४०० पैकी जवळपास ५० ते १०० बस जून २०२१ पर्यंत दाखल होणे अपेक्षित होते. तर उर्वरित बस नोंव्हेंबर किंवा डिसेंबपर्यंत दाखल होणार होत्या. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्याच्या प्रक्रियेस विलंब झाला.

त्यामुळं आता पहिल्या टप्प्यात १०० बस सप्टेंबपर्यंत दाखल होतील. उर्वरित ३०० बसगाड्या टप्प्याटप्यात येण्यासाठी २०२२ साल उजाडण्याची शक्यता आहे. या बसगाड्यांवर चालकाबरोबरच वाहकही कंपनीचा असेल. यासंदर्भात बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी ४०० पैकी सुमारे १०० बस सप्टेंबपर्यंत येतील असे स्पष्ट केले. तर उर्वरित बसगाडय़ाही दाखल होण्यास विलंब होणार आहे.

भाडेतत्वावरील बस दाखल करणाऱ्या कंपनीकडून चालकाबरोबरच वाहकही नियुक्त केले जाणार आहेत. परंतु टाळेबंदीमुळे चालक, वाहकांच्या मुलाखती, त्यांची चाचणी प्रक्रि या रखडली. शिवाय प्रायोगिक तत्वावर बसची चाचणीही घेणे अपेक्षित असते. त्यावरही परिणाम झाल्याने या बस दाखल होण्यास विलंब होत असल्याचे ते म्हणाले. ४०० बसगाड्यांवर चालकाबरोबरच वाहकही कंपनीचा असणार आहे.

बेस्ट बसमधून प्रवास करताना एका आसनावर एकच प्रवासी असा नियम आहे. तर उभ्याने प्रवास करण्याची मुभा नाही. परंतु मुंबईत काही बसगाड्यांमध्ये प्रवासावेळी हा नियम पाळला जात नाही. शिवाय गर्दीही होते. कोरोनाकाळात बेस्टच्या मदतीला एसटीच्या १ हजार गाड्या सेवेसाठी होत्या. त्यांची संख्या मध्यंतरी कमी करुन ५०० केली. मात्र राज्याच्या विविध भागांतून मुंबईत बेस्टच्या सेवेसाठी येणाऱ्या एसटी चालकांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले व एसटी महामंडळाने बेस्टच्या मदतीसाठी असलेल्या गाड्यांची संख्या २५० पर्यंत कमी केली. त्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येवर व प्रवासावरही परिणाम होत आहे.



हेही वाचा - 

हेही वाचा

वसई-विरार पालिकेनं राबवली डोर टू डोर मोहीम

COVID-19 Second Wave: मे मध्ये ० ते १८ वयोगटातील फक्त ०.०७% मुलांना कोरोनाचा संसर्ग

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा