Advertisement

कोरोनामुळं प्रवाशांची शिवनेरी बसकडे पाठ, केवळ १० ते १५ टक्केच प्रतिसाद


कोरोनामुळं प्रवाशांची शिवनेरी बसकडे पाठ, केवळ १० ते १५ टक्केच प्रतिसाद
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं बंद असलेली वाहतूक सेवा मिशन बिगिन अगेन अंतर्गत सुरू करण्यात आली. त्यानुसार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली. तसंच, सामान्यांसाठी एसटी महामंडळाची वाहतूक सेवा सुरू करण्यात आली. दरम्यान, एसटीचा राज्यांतर्गत प्रवास सुरू झाल्यानंतर सर्वाधिक मागणी असलेल्या मुंबई, ठाणे ते पुणे मार्गावरील वातानुकूलित शिवनेरी सेवा पूर्ववत झाली असली तरी कोरोनाच्या धास्तीने दोन्ही शहरांतील नागरिकांनी प्रवास न करणं पसंत केलं आहे.

मागील २० दिवसांत या सेवेला केवळ १० ते १५ टक्केच प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या ४४ ऐवजी २२ प्रवासी घेऊनच जाण्याची मुभा असल्याने शिवनेरीला मुंबई, ठाण्यातून जाताना व पुण्यातून परतीच्या प्रवासातही बहुतांश वेळा कमीच प्रवासी मिळतात. २० ऑगस्टला १०० प्रवाशांनी शिवनेरीतून प्रवास केला होता.

सध्या शिवनेरीच्या मुंबई ते पुणे रेल्वे स्थानक अशा दररोज ३१ फे ऱ्या होतात. तर ठाणे ते पुणे मार्गावर १४ फेऱ्या होत असल्याची माहिती दिली. तर पुण्यातून मुंबई, ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या गाडय़ांनाही १० ते १५ टक्के प्रतिसाद मिळत आहे. सध्याच्या घडीला या दोन्ही शहरांत करोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद कमीच आहे.

गतवर्षी जुलै महिन्यात शिवनेरीच्या भाडेदरात ८० ते १२० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली. त्यामुळे शिवनेरीचा प्रवास स्वस्त झाला. भाडे कपातीमुळे २०१८च्या तुलनेत २०१९मध्ये शिवनेरीच्या दररोजच्या प्रवासीसंख्येत वाढ झाली. ही संख्या २१ हजारांपर्यंत पोहोचली. 

२०२०च्या फेब्रुवारीपर्यंत ही वाढ कायम राहिली. तर बसगाडय़ांची संख्याही वाढून ३०० फे ऱ्या होऊ लागल्या. टाळेबंदीत बंद असलेला हा २० ऑगस्टपासून सुरू झाला आणि मुंबई, ठाणे ते पुणे मार्गावर शिवनेरीसह निमआरामही गाडय़ा धावू लागल्या. परंतु निमआराम गाडय़ांचे प्रमाण कमी आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय