Advertisement

मेट्रो सेवा सुरू झाली; पण प्रवाशांची धावपळ कायम

सर्व प्रवाशांसाठी उपनगरी रेल्वे सेवा खुली नसल्यामुळे प्रवाशांची धावपळच होत आहे.

मेट्रो सेवा सुरू झाली; पण प्रवाशांची धावपळ कायम
SHARES

कोरोनामुळं बंद असलेली मेट्रो सोमवारपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. सरसकट सर्व प्रवाशांसाठी घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतू, सर्व प्रवाशांसाठी उपनगरी रेल्वे सेवा खुली नसल्यामुळे प्रवाशांची धावपळच होत आहे. अनेक प्रवाशांना म्हणजेच नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली येथील प्रवाशांना मेट्रोने प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

राज्य सरकारच्या परवानगीनंतर मेट्रो सेवा सोमवारपासून सुरू झाली. उपनगरातून, तसंच पनवेल, कल्याण-डोंबिवली येथून अनेक प्रवासी अंधेरी, चकाला, साकीनाका भागांत कामासाठी येत असतात. उपनगरी रेल्वेने प्रवास करता येत नसल्याने त्यांना २ ते ३ वाहने बदलून घाटकोपर इथं मेट्रो स्थानकापर्यंत यावे लागते.

कळंबोलीहून चकाला इथं जाण्यासाठी बसने घाटकोपर (पूर्व) आगार गाठायचे. तेथून चकाला गाठण्यासाठी बस लवकर मिळत नाही. मेट्रो स्थानकापर्यंतच्या बससाठी पुन्हा एलबीएस मार्गावर चालत जावे लागते. या मेट्रो मार्गावरील  स्थानकांतून दिवसाला २ लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतात. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा