मोनो रेलच्या सुरक्षेला 'तडे' ?


  • मोनो रेलच्या सुरक्षेला 'तडे' ?
SHARE

मुंबई - एकीकडे मोनोच्या दुस-या टप्प्याच्या चाचण्या यशस्वी होत आहेत, मात्र मोनोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गावरील पिलरच्या पायाच्या बांधकामाला तडे गेल्याने मोनोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

मोनोच्या पहिल्या टप्प्यातील प्रतीक्षानगर ते भक्ती पार्क या स्थानकादरम्यान वडाळा येथील आयमॅक्स मार्गावर जवळपास 40 ते 45 पिलर आहेत. यापैकी काही पिलरचा पाया निकृष्ट बांधकामामुळे उखडला आहे. त्यामुळे मोनोचा प्रवास प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र एमएमआरडीए प्रशासन या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. 
काही महिन्यांपूर्वीच या पिलरच्या उखडलेल्या पायांची वरवरची डागडुजी करण्यात आली. मात्र या डागडुजीमुळे या पिलरांच्या पायांजवळील रस्त्यावर उंचवटे तयार झाले आहेत. परिणामी या रस्त्यावरून भरधाव धावणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहे. या ठिकाणी दररोज चार ते पाच अपघात होत असून, यामध्ये दुचाकींचे प्रमाण जास्त असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले.  याबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या