Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटण्याची शक्यता


एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटण्याची शक्यता
SHARES

एसटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन देण्यासाठी २५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं एसटी महामंडळाला वेतन अदा करण्यासाठी सवलत मूल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी २५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळं एप्रिल महिन्याचे मासिक वेतन कर्मचाऱ्यांना देण्यासंबंधात एसटी महामंडळाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

एप्रिल महिन्याचे मासिक वेतन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना (मान्यताप्राप्त), महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस यांच्यावतीने  वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री,  परिवहन मंत्री, परिवहन राज्यमंत्री यांना पत्रव्यवहार केला गेला होता. एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याबाबत राज्य शासनाकडं विविध सवलतींच्या प्रतिपूर्तीचा शिल्लक निधी मिळण्याबाबत महामंडळाकडून  प्रस्ताव पाठवला गेला होता. तो निधी लवकरात लवकर मिळविण्यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरू होते. 

संघटनेच्या नेतृत्वाकडून वेतन देण्याबाबत सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. या सर्व प्रयत्नांमुळं राज्य सरकारच्या निर्णयानुसार २५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. उत्पन्न थांबल्यानं १ लाख ७ हजार कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. पण राज्य सरकारनं सवलतीची प्रतिपूर्ती असलेल्या ५४७ लाखांच्या रकमेपैकी २५० कोटी एसटीला देऊ केल्यानं एका महिन्यापुरता वेतनाचा तिढा सुटला आहे. ही रक्कम तात्काळ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली होती.



हेही वाचा -

महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन? पण केंद्रानंतरच घोषणेची शक्यता

मुंबईहून रत्नागिरीत 'असा' फोफावतोय कोरोना? गावकरी आले टेन्शनमध्ये



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा