Advertisement

मुंबईहून रत्नागिरीत 'असा' फोफावतोय कोरोना? गावकरी आले टेन्शनमध्ये

रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी २४ पैकी २२ कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन यंत्रणा धास्तावली आहे.

मुंबईहून रत्नागिरीत 'असा' फोफावतोय कोरोना? गावकरी आले टेन्शनमध्ये
SHARES

रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी २४ पैकी २२ कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन यंत्रणा धास्तावली आहे. कोरोनाची लागण झालेले बहुतांश रुग्ण हे मुंबईहून रत्नागिरीत दाखल झालेले चाकरमानी असल्याने गावकऱ्यांची चिंता देखील वाढली आहे. हाती आलेल्या शेवटच्या आकडेवारीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७४ वर जाऊन पोहोचली आहे. 

हेही वाचा- सायन रूग्णालयात १०० कोरोना पॉझिटिव्ह महिलांची बाळंतपणं यशस्वी

राज्य सरकारने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अडकलेले परप्रांतीय आणि स्थानिकांना आपापल्या घरी परतण्यासाठी प्रवासाची मुभा दिली आहे. याचा लाभ घेत अनेक चाकरमानी मुंबई आणि ठाण्यातून पळवाटा शोधून कोकणातील गावी जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही मोठी आहे. मुंबईहून गावात दाखल होणारे चाकरमानी आणि त्यांच्या कुटुंबियांना १४ दिवसांसाठी गावाबाहेरच्या शाळा वा शासकीय परिसरात ठेवण्यात येत असलं, तरी या नियमाचं काटेकारपणे पालन होत नसल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे.

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी केवळ ४०० बेडचीच व्यवस्था आहे. त्यात मुंबईकर कोरोनाग्रस्तांची भर पडल्यास यंत्रणेवर मोठा ताण पडू शकतो. जिल्हा आरोग्य व प्रशासकीय यंत्रणांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये मंडणगड तालुक्यातील ११, दापोलीतील ४, रत्नागिरीतील ७ रुग्णांचा समावेश आहे. रत्नागिरीत सापडलेल्या ७ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४ महिला असून ३ पुरुष आहेत. मंडणगडमधील ११ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७ पुरुष व ४ महिला आहेत तर दापोलीत सापडलेले चारही पॉझिटिव्ह रुग्ण पुरुष आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७४ इतकी झाली आहे.

हेही वाचा- कोरोना चाचण्यांबाबत पालिकेची पुन्हा एकदा नवी नियमावली

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा