Advertisement

सायन रूग्णालयात १०० कोरोना पॉझिटिव्ह महिलांची बाळंतपणं यशस्वी

सायन रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेस यांना याचं श्रेय जातं. त्यांनी घेतलेल्या काळजीमुळे या महिलांचं बाळंतपण योग्यरित्या पार पडलं.

सायन रूग्णालयात १०० कोरोना पॉझिटिव्ह महिलांची बाळंतपणं यशस्वी
SHARES

सायन रूग्णालयात १०० कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिलांचं यशस्वी बाळंतपण करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे योग्य ती काळजी घेतल्यानं एकाही बाळाला कोरोनाची लागण झाली नाही. सर्व नवजात बालकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

सायन रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेस यांना याचं श्रेय जातं. त्यांनी घेतलेल्या काळजीमुळे या महिलांचं बाळंतपण योग्यरित्या पार पडलं.  कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी, गोवंडी, मानखूर्द भागातील गरोदर महिला सायन रूग्णालयात दाखल होत्या. सायन रूग्णालयात मागील 3 आठवड्यात कोरोनाची लागण झालेल्या 103 महिलांची  बाळंतपणं यशस्वी करण्यात आली.  यामध्ये 55 सिझेरिन तर 48नॉर्मल बाळंतपण करण्यात आली. 

संबंधित महिलांना मास्क लावून बाळाला दूध पाजण्यासही परवानगी दिली आहे. तसंच रूग्णालयात महिलांची आणि बाळांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. जिथे सगळीकडे कोरोनामुळे एक भीती, नकारात्मक विचार असताना या घटनेने सगळ्यांनाच समाधान मिळालं आहे. 



हेही वाचा -

कोरोना चाचण्यांबाबत पालिकेची पुन्हा एकदा नवी नियमावली

मुंबई : COVID 19 च्या तपासणीसाठी पहली मोबाइल टेस्टिंग बस




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा