Advertisement

मुंबई : COVID 19 च्या तपासणीसाठी पहली मोबाइल टेस्टिंग बस

कृष्णा डायग्नोस्टिक आणि आयआयटी माजी विद्यार्थ्यांच्या मदतीनं तयार करण्यात आली आहे.

मुंबई : COVID 19 च्या तपासणीसाठी पहली मोबाइल टेस्टिंग बस
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus Update) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान मुंबईत पालिका (BMC) आणि आयआयटी (IIT) माजी विद्यार्थी परिषद झाली. आयआयटीनं COVID 19 च्या चाचणीसाठी खास बस सुरू केली आहे. ती लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यांची चाचणी करते.

मुंबईतील (Mumbai News)पहिली मोबाईल COVID 19 टेस्टिंग बस (Mobile Testing Bus)मध्ये पूर्णपणे सुसज्ज लॅब आहे. याशिवाय बसमध्ये एक्स-रे मशिनची सुविधा देखील आहे. बसमध्ये एक लहान चेंबर देखील आहे, ज्यात कोरोना टेस्ट घेण्याची सुविधा आहे.

सामूहिक तपासणीसाठी ही पहिली मोबाईल टेस्टिंग बस असल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कोरोनाव्हायरसनं ग्रस्त आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी ०२ कॉम्बिनेशन सेचुरेशन पद्धतीचा वापर केला जाईल.

पालिकेनं सांगितलं की, COVID 19 टेस्टिंग बस आरटी-पीसीआर स्वॅब कलेक्शन सुविधेसह सुसज्ज आहे. ही बस दाट लोकवस्ती असलेल्या भागातही जाईल आणि तपासणीनंतर उच्च जोखीम संशयिचं विलगीकरण करण्यास मदत करेल. ही टेस्टिंग बस कृष्णा डायग्नोस्टिक आणि आयआयटी माजी विद्यार्थ्यांच्या मदतीनं तयार करण्यात आली आहे. अशा आणखी बसेसची रचना तयार करण्याची तयारी पालिका करत आहे.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा