Advertisement

कोरोना चाचण्यांबाबत पालिकेची पुन्हा एकदा नवी नियमावली

याआधी पालिकेने कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तींच्या चाचण्या न करण्याचा निर्णय घेतला होता. पण चाचण्याबाबतचा गोंधळ दूर करत पुन्हा एकदा पालिकेने नवीन नियम जाहीर केले आहेत.

कोरोना चाचण्यांबाबत पालिकेची पुन्हा एकदा नवी नियमावली
SHARES

मुंबई महापालिकेने कोरोना चाचण्यांबाबत आता पुन्हा एकदा नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार, विलगीकरणात असलेल्या आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या तसंच जोखमीच्या गटातील व्यक्तींना लक्षणे नसली तरी 5 व्या आणि 14 व्या दिवशी त्यांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. 

याआधी पालिकेने कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तींच्या चाचण्या न करण्याचा निर्णय घेतला होता. पण चाचण्याबाबतचा गोंधळ दूर करत पुन्हा एकदा पालिकेने नवीन नियम जाहीर केले आहेत.  नवीन नियमानुसार, लक्षणे असलेल्या आणि कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, आरोग्य कर्मचारी यांची चाचणी केली जाणार आहे. प्रतिबंधित, उद्रेक मोठय़ा प्रमाणात असलेली ठिकाणे, स्थलांतरितांचे कॅम्प या ठिकाणाहून प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची चाचणी होईल.

कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची निदान झाल्यापासून 7 ते 9 दिवसांच्या कालावधीत लक्षणे न आढळल्यास दुसरी चाचणी केली जाणार नाही. मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये नंतर कोणतीही लक्षणे न आढळल्यास त्यांची पुन्हा चाचणी होणार नाही. वॉर्डमधील व्यक्तींची नमुने घेण्याची प्रक्रिया वॉर्डमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल.

 पालिकेच्या किंवा खासगी दवाखाने, रुग्णालयांमध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करून चाचणी करण्यासाठी पाठविले जाईल. नमुने प्राप्त झाल्यानंतर प्रयोगशाळांनी २४ तासांत अहवाल देणं आवश्यक आहे. अहवाल आल्यानंतर एका तासात बाधित रुग्णांची माहिती पालिकेला कळविणे गरजेचं आहे. खासगी प्रयोगशाळांना घरी जाऊन नमुने घेण्यास बंदी असल्याचंही पालिकेने स्पष्ट केले आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये वैद्यकीय अधिकारी खासगी प्रयोगशाळांना घरी जाऊन नमुने घेण्यास सांगितलं जाईल, असं नवीन नियमावतील सांगण्यात आलं आहे.

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यासाठी कोरोना चाचणी अहवालाची मागणी रुग्णालयांनी करू नये, असे  निर्देश पालिकेने नवीन  नियमावलीत दिले आहेत. प्रत्येक डायलिसिसच्या वेळेस रुग्णाला कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचंही पालिकेने सांगितलं आहे.



हेही वाचा -

यंदा पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी

मुंबई : COVID 19 च्या तपासणीसाठी पहली मोबाइल टेस्टिंग बस



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा