Advertisement

धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या १००० पार


धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या १००० पार
SHARES

मुंबईत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येनं १००० आकडा पार केला आहे. बुधवारी धारावी परिसरात कोरोनाच्या ६६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एकूण बाधितांची संख्या हजारांहून अधिक झाली आहे. तर आतापर्यंत ४० करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. धारावीप्रमाणं दादर आणि माहीममध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

धारावीला कोरोना व्हायरसनं चांगलंच टार्गेट केलं आहे. मंगळवारी ६६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०२८ झाला आहे. त्याचप्रमाणं, दादर परिसरात दिवसभरात ८ नवीन रुग्ण सापडले. त्यामुळं एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३३ झाली आहे. तर आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

माहीममध्ये १२ नवे रुग्ण सापडले. त्यामुळं माहीममधील रुग्णसंख्या १५५ झाली आहे. तर आतापर्यंत सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दादरमधील २१ रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर माहीममध्ये ३१ रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.



हेही वाचा -

यंदा पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी

मुंबई : COVID 19 च्या तपासणीसाठी पहली मोबाइल टेस्टिंग बस



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा