Advertisement

गेट वे आॅफ इंडिया ते मांडवा प्रवाशांची लूट


गेट वे आॅफ इंडिया ते मांडवा प्रवाशांची लूट
SHARES

गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा या प्रवासासाठीचे तिकीट दर प्रत्यक्षात २९ दर्शवले असताना या प्रवासासाठी विविध बोट कंपन्या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारत असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षात तिकिटाचं दर २९ रुपये असताना बोट कंपन्या प्रवाशांकडून १२० ते १८५ रुपये दर का आकारतात? याचा खुलासा शासनाने करावा, अशी मागणी केली जात आहे.


तिकीट दर अतिरिक्त का?

प्रवासी तिकिटांचे दर मुंबई बंदर विश्वस्त मंडळ (मुंबई पोर्ट ट्रस्ट) कडून ठरवले जातात, अशी माहिती मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचं सामाजिक कार्यकर्ते सावंत यांनी सांगितलं.


प्रवाशांनी केली तक्रार

मुंबई पोर्ट ट्रस्ट कोणत्या पद्धतीने दर ठरवते? याची माहिती प्रवाशांना का दिली जात नाही? असे प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले. काही प्रवाशांनी याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टकडून माहिती अधिकाराखाली माहिती मागवण्याचा प्रयत्न केला. परंतु मुंबई पोर्ट ट्रस्ट माहिती देत नसल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली आहे.


'याचं' उत्तर द्या

मुंबई मांडवा प्रवास करताना जे तिकीट दिलं जातं त्यामध्ये मांडवा ते अलिबाग हा बस प्रवास समाविष्ट असल्याचं सांगितलं जातं. परंतु जर या बससेवेची सुविधा प्रवाशांनी घेतली नाही, तरी प्रवाशांना अतिरिक्त दर लावला जातो, याबाबतही मुंबई पोर्ट ट्रस्टने उत्तर द्यावं, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

मुंबई मांडवा जलमार्गावर चालणाऱ्या पीएनपी मेरीटाईम कंपन्यांच्या बोटी ज्यांच्या मालकीच्या आहेत ते आमदार जयंत पाटील यांनी जलवाहतुकीसाठी प्रति किलोमीटर खर्च २५ पैसे येत असल्याचा दावा केला आहे. मग जलहवातुकीसाठी प्रवाशांकडून अव्वाचे सव्वा दर का आकारले जात आहेत? असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.


प्रवासी संतप्त

‘राष्ट्रीय जलमार्ग विधेयक 2015’नुसार रस्ते आणि रेल्वे वाहतुकीच्या तुलनेत जलमार्गांचा वापर मागे आहे. त्यामुळे देशभरातील जलमार्ग आंतरदेशीय जलमार्गांशी जोडून या मार्गाच्या विकासावर भर दिला जाणार असल्याचं सरकारने जाहीर केलं होतं. शिवाय जल वाहतुकीवर प्रति किलोमीटर केवळ ५० पैसे खर्च होतात. रेल्वेमार्गाने एक रुपये तर रस्ते वाहतुकीतून दीड रुपये खर्च होतात, अशी माहिती खुद्द केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. मग मांडवा जलवाहतूक मार्गावरील वाहतूक कंपन्या प्रवासी तिकिटांचे दर इतके का आकारतात? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जाऊ लागला आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा