खासगी बसच्या थांब्यामुळे वाहतूककोंडी

 Chembur
खासगी बसच्या थांब्यामुळे वाहतूककोंडी
खासगी बसच्या थांब्यामुळे वाहतूककोंडी
See all

चेंबूर - मुंबईतून राज्यातील विविध ठिकाणी रोज शेकडो खासगी बसची वाहतूक सुरू असते. सर्व बस चेंबूरच्या डायमंड उद्यान आणि मैत्री पार्क रोडवर संध्याकाळी सहानंतर रस्त्यालगत उभ्या केल्या जातात. परिणामी रात्री उशिरापर्यंत सायन-ट्रॉम्बे मार्गावर मोठी वाहतूककोंडी होते. सणासुदीच्या दिवसात तर याठिकाणी मोठ्या प्रमाणात खासगी बस उभ्या असल्यानं हा मार्गच पूर्णतः ठप्प होतो. अनधिकृतरित्या उभ्या केल्या जाणाऱ्या या बसवर वाहतूक पोलीसही काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप गणेश खवळे या रहिवाशानं केला असून या बसचा थांबा चेंबूरबाहेर करावा, अशी त्यांची मागणी आहे.

Loading Comments