पासधारकांच्या खिशाला चाप बसणार

 Pali Hill
पासधारकांच्या खिशाला चाप बसणार
पासधारकांच्या खिशाला चाप बसणार
पासधारकांच्या खिशाला चाप बसणार
See all

मुंबई- पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत रेल्वेने भाडेवाढीचा विचार केलाय. त्यासंदर्भात एक प्रस्ताव तयार कऱण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर केल्यास दररोज लाखोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या मासिक पासधारक प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. मागील वर्षी पश्चिम रेल्वेला झालेला 1,400 कोटींचा तोटा भरुन काढण्यासाठी हा प्रस्ताव पाठवण्यात आलाय. त्यामुळे उपनगरीय रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या पासदरात 47 टक्क्यांनी तर सेकंड क्लासच्या पासदरात 38 टक्क्यांनी भाडेवाढ होऊ शकते. सध्या किमान तिकीटासाठी असलेलं 9 किमीची मर्यादाही 5 किमीवर आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाट बसणार आहे. रेल्वेमंत्री म्हणुन सुनील प्रभू यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर रेल्वेने अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्म, मालवाहतुक, वातानुकुलीत भाववाढ केलेली आहे. आता त्यांनी प्रवासी वाहतुकीमध्ये वाढ केल्यास आचर्य वाटणार नाही. मात्र या भाडेवाढीला कॉंग्रेस विरोध करेल असा इशारा मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिलाय. तर गेल्या काही वर्षांपासून तिकीटात भाडेवाढ झालेली नाही. हा प्रस्ताव अदयाप दिल्ली रेल्वे प्रशासनाकडे गेला नाही. ही भाडेवाढ फक्त सीझन मासिक पासधारकांसाठी होणार असल्याचं पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी गजानन म्हापूतकर यांनी सांगितलं.. 

Loading Comments