Advertisement

रेल्वे कलर कोडेड क्यूआर तिकिट आणण्याच्या विचारात

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी कार्यालयीन वेळेच्या घोषणेच्या अनुषंगानं कलर कोडेड क्यूआर कोड प्रणालीचा वापर करावा, अशी मागणी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली.

रेल्वे कलर कोडेड क्यूआर तिकिट आणण्याच्या विचारात
SHARES

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी कार्यालयीन वेळेच्या घोषणेच्या अनुषंगानं कलर कोडेड क्यूआर कोड प्रणालीचा वापर करावा, अशी मागणी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली. यासाठी त्यांनी मंगळवारी राज्य सरकारचू भेट घेतली. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रवाशांना एका ठराविक वेळेच्या दरम्यानच प्रवास करण्याची मुभा दिली जाते.

अधिकाऱ्यांनी पुढे असंही सांगितलं की, प्रत्येक स्लॉटला एक रंग देण्यात येईल. याशिवाय तिकिट किंवा ट्रॅव्हल पासमध्ये क्यूआर कोडवर देखील प्रदर्शित केला जाऊ शकतो. कलर कोडिंगची कल्पना कोलकाता मेट्रोपासून प्रेरित होऊन राबवण्याचा विचारकेला जात आहे.

बैठकीस उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, “आम्ही लोकल ट्रेनच्या कप्प्यात गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयातील वेळेत बदल करण्यास सांगितलं आहे. सर्व लोकल गाड्यांच्या ऑपरेशनसाठी कलर-कोड क्यूआर सिस्टम सुरू करता येतील. आम्ही राज्य सरकारला याची शिफारस केली आहे. एकदा गाड्या सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरू झाल्यास या प्रणालीचा उपयोग होईल.”

तथापि, मोठ्या प्रमाणावर याची अंमलबजावणी होऊ शकत नाही हे अधिकाऱ्यांनाही ठाऊक आहे. सरकारनं अशी अपेक्षा केली आहे की, अशा क्षेत्रांमधील कार्यालयांना या प्रणालीचा फायदा होईल जिथं कर्मचारी वेगवेगळ्या वेळेत कामावर येतात. सार्वजनिक वाहतुकीच्या प्रवासासाठी अशा क्षेत्रांना प्राधान्य दिले जाऊ शकते.

“आम्ही रेल्वे स्थानकांवर गर्दी रोखण्यासाठी कामकाजाच्या तासांमध्ये बदल करण्यासंदर्भात चर्चा केली. पण, अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍याबद्दल प्रश्न अनुत्तरीतच आहे. जरी आम्ही त्यांचे नियमन करण्याचा प्रयत्न केला तरी वेळेचे निरीक्षण करणं खूप अवघड आहे,” असं मंत्रालयाच्या एका अधिका्यानं एचटीद्वारे सांगितलं.

“जरी आम्ही विविध क्षेत्रासाठी प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) किंवा मार्गदर्शक तत्त्वे जारी करतो, तरीही त्यांचे पालन केले जाते की नाही हे पाहण्यासाठी कोणीच नाही. सध्या आम्ही खाजगी कार्यालयांतील ३० टक्के कर्मचार्‍यांना परवानगी दिली आहे. परंतु बर्‍याच कंपन्या अधिक कर्मचार्‍यांना कार्यालयात हजर राहण्यास भाग पाडत आहेत. मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यासाठी सरकारकडे यंत्रणा नाही."

पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गर्दी कमी करण्यासाठी ते लोकल सेवा ५०६ वरून ७०० पर्यंत वाढवतील. यात दहा एसी लोकलचा समावेश असेल, असे डब्ल्यूआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितलं.



हेही वाचा

पश्चिम रेल्वेच्या अपंग प्रवाशांची लोकल प्रवासासाठी प्रतीक्षा कायम

रेल्वे भरतीसाठी परीक्षेच्या तारखा जाहीर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा