Advertisement

ज्यांचं लसीकरण पूर्ण झालंय त्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या - रेल्वे प्रवासी संघटना

वयाची ४५ वर्षे आणि लसीकरण पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलमधून प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.

ज्यांचं लसीकरण पूर्ण झालंय त्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या - रेल्वे प्रवासी संघटना
SHARES

मुंबईसह (mumbai) राज्यात कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर लावण्यात आलेलं लॉकडाऊन १ जूनपासून शिथिल केलं जाणार आहे. मात्र यामध्ये सर्वसामान्यांचा लोकल प्रवासही सुरू होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र याआधीच राज्य सरकारनं पुढचे १५ दिवस तरी लोकल प्रवास सुरु होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता

वयाची ४५ वर्षे आणि लसीकरण पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलमधून प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.

कोरोनामुळं लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका नोकरदार वर्गासह अनेकांना बसला आहे. अनेकांवर आर्थिक संकट ओढवलं आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई सर्वच भागात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मुंबईतील कोरोना दुपटीचा कालावधी ११ महिन्यांपर्यंत पोहोचला आहे.

लाखो कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्याचा शासनाने गंभीरपणे विचार करायला हवा. मुख्यमंत्र्यानी आवाहन करूनही अपवाद वगळता बहुसंख्य खासगी आस्थापना आपल्या कर्मचाऱ्यांना या काळात पगार देत नाहीत. ही स्थिती लक्षात घेता १ जूनपासून दोन्ही डोस घेतलेल्या सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करणे योग्य ठरेल. यामुळे सर्वसामान्यांचे प्रवास यातनेतून सुटका होईल.

राज्याचे अर्थचक्र सुरळीत ठेवण्यासाठी कारखाने सुरू आहेत; मात्र कामावर जाण्यासाठी लोकल प्रवासाला परवानगी नाही, हा मोठाच विरोधाभास आहे. यामुळे अशा प्रवाशांना लोकल मुभा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे', अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केली आहे.



हेही वाचा - 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा