प्रवाशांना सहज ओळखता येणार बोगस टिसी

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील स्थानकांवर तोतया तिकीट तपासनीसांमुळं प्रवाशांची लूट होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं तोतया तिकीट तपासनीसांवर कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वेनं प्रायोगिक तत्त्वावर एक प्रकल्प सुरू केला आहे.

SHARE


तोतया तिकीट तपासनीस

पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांत मागील काही वर्षांत तोतया तिकीट तपासनीसांमुळं प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लुटमार झाली आहे. त्यामुळं याचा फटका मध्य रेल्वेला बसत असल्यानं तोतया तिकीट तपासनीसांवर आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेनं ठाणे स्थानकात एक प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पार्तंगत सर्व तिकीट तपासनीसांना क्यूआर कोड असलेले ओळखपत्र देण्यात आले आहेत.


'क्यूआर कोड'द्वारे मिळणार माहिती

तिकीट तपासनीसांच्या ओळखपत्रावरील 'क्यूआर कोड' रेल्वेच्या सव्‍‌र्हरशी जोडण्यात आला असून यामध्ये तिकीट तपासनीसांची सर्व माहिती उपलब्ध आहे. त्यामुळं तिकीट तपासनीसांच्या ओळखपत्रावरील 'क्यूआर कोड' प्रवाशांनी मोबाइलवर स्कॅन केल्यास त्यांना मोबाइलवर तिकीट तपासनीसाची सर्व माहिती मिळणार असून, तिकीट तपासनीस रेल्वेचा कर्मचारी आहे की, तोतया आहे हे समजण्यास मदत होणार आहे. दरम्यान, ठाणे स्थानकात तोतया तिकीट तपासनीसांविरोधात सुरू करण्यात आलेली मोहीम यशस्वी झाल्यास त्या प्रकल्पाची अंमलबजावणी मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर करण्यात येणार आहे.हेही वाचा -

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते दिवा स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मुंबईची हवा प्रदूषितच; प्रजा फाऊंडेशनचा धक्कादायक अहवालसंबंधित विषय