कल्याण ते दिवा स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉक

कल्याण ते दिवा स्थानकांदरम्यान पायाभूत कामं करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावरील बुधवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

SHARE

कल्याण ते दिवा स्थानकांदरम्यान पायाभूत कामं करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावरील बुधवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. बुधवारी रात्री १०.३० ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत ५ तासांचा रात्रकालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसंच, सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, रात्रकालीन ब्लॉककाळात मध्य रेल्वेनं लोकलच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.


चार लोकल रद्द

रात्रकालीन ब्लॉकदरम्यान कल्याणहून रात्री ९.५४ मिनीटांची आणि रात्री १०.२४ मिनिटांची सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच, सीएसएमटीहून कल्याणच्या दिशेनं सुटणारी रात्री ११.५ मिनिटांची आणि पहाटे ४.४१ मिनिटांची लोकल रद्द करण्यात आली आहे. 

त्याशिवाय, रात्री १०.३२ मिनिटांची कल्याणहून सीएसएमटीला जाणारी जलद लोकल १०.५४ मिनिटांनी कल्याण ते दिवा स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार असून सीएसएमटी दिशेकडं जाणाऱ्या मेल आणि एक्स्प्रेसदेखील धीम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत.हेही वाचा -

एचडीएफसीपाठोपाठ एसबीआयची व्याजदर कपातसंबंधित विषय
ताज्या बातम्या