Advertisement

एचडीएफसीपाठोपाठ एसबीआयची व्याजदर कपात

एचडीएफसी (HDFC) या खाजगी बँकेपाठोपाठ सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया (SBI)ने व्याजदारांत ०.०५ टक्के इतकी नाममात्र कपात केली आहे. एसबीआयचे नवे व्याजदर बुधवारपासून लागू होतील.

एचडीएफसीपाठोपाठ एसबीआयची व्याजदर कपात
SHARES

एचडीएफसी (HDFC) या खाजगी बँकेपाठोपाठ सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया (SBI)ने व्याजदारांत ०.०५ टक्के इतकी नाममात्र कपात केली आहे. एसबीआयचे नवे व्याजदर बुधवारपासून लागू होतील.


एचडीएफसीची व्याजदर कपात

रिझर्व्ह बँकेने द्विमासिक पतधोरण जाहीर करताना रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची (०.२५) कपात केली होती. त्यानंतर एचडीएफसी बँकेने आपल्या मार्जिनल काॅस्ट आॅफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये ०.१० टक्क्यांची कपात केली. या कपातीनंतर बँकेच्या १ वर्षांच्या कर्जावरील एमसीएलआर ८.७५ टक्क्यांवरून ८.६५ टक्क्यांवर आला आहे. तसंच बँकेने ६, ३ आणि १ महिन्यांच्या कर्जावरील एमसीएलआर घटवून अनुक्रमे ८.४५ टक्के, ८.३५ टक्के आणि ८.३० टक्के एवढा केला आहे. यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज इ. कर्जाच्या हप्त्यात घट होणार आहे.


एसबीआयची व्याजदर कपात

याचसोबत एसबीआयने देखील व्याजदरात ०.०५ इतकी कपात केल्याने बँकेचा एमसीएलआर ८.५५ टक्क्यांवरून ८.५० टक्क्यांवर आला आहे. बँकेने ३० लाख रुपयांच्या गृहकर्जावरील व्यादरात ०.१० टक्के कपात केली आहे. त्यामुळे नवा व्याजदर ८.६० ते ८.९० टक्क्यांपर्यत असतील.


MCLR म्हणजे काय?

मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) हा दर असतो, ज्याच्या आधारे बँका आपले व्याजदर निश्चित करतात. हे पायाभूत दर असतात. त्यामुळेच MCLR वाढल्यास व्याजदर वाढतात, तर MCLR कमी झाल्यास व्याजदर कमी होतात. परिणामी EMI देखील कमी होतो.



हेही वाचा-

कर्जाचे हप्ते घटणार, RBI ने केली व्याजदर कपात

आता रेमंड रिअल इस्टेट क्षेत्रात उतरणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा