आता रेमंड रिअल इस्टेट क्षेत्रात उतरणार

टेक्सस्टाईल क्षेत्रातील नावाजलेली कंपनी रेमंडनं आता रिअल इस्टेट क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. रेमंडनं ठाण्यामध्ये २० एकर जागेवर एक निवासी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

SHARE

टेक्सस्टाईल क्षेत्रातील नावाजलेली कंपनी रेमंडनं आता रिअल इस्टेट क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. रेमंडनं ठाण्यामध्ये २० एकर जागेवर एक निवासी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.


३ हजार घरं

रेमंड रियल्टी या नावानं रेमंड बांधकाम क्षेत्रात उतरणार आहे. कंपनीनं बुधवारी याबाबत माहिती दिली. शेअरधारकांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती कंपनीचं चेअरमन आणि एमडी गौतम हरी सिंघानीया यांनी दिली. २० एकर जागेपैकी १४ एकर जागेवर निवासी संकुल उभारण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात ३ हजार घरं उभारली जाणार आहेत. कंपनीला येत्या ५ वर्षांमध्ये याद्वारे २५ टक्के प्रॉफिट मार्जिनसोबतच ३ हजार ५०० कोटी रूपयांच्या व्यवसायाची अपेक्षा आहे. यापूर्वी टाटा, महिंद्रा, बॉम्बे डाईंगसारख्या कंपन्यांनीही रियल इस्टेट क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

या योजनेअंतर्गत १० टॉवर्समध्ये ३ हजार घरं बांधण्यात येणार आहे. यासाठी कंपनीला कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्याची आवश्यकता नसल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं.
हेही वाचा -

कर्जाचे हप्ते घटणार, RBI ने केली व्याजदर कपात

फसव्या बिल्डरांना महारेराचा दणका; बिल्डरांकडून प्रकल्प काढून घेता येणारसंबंधित विषय