Advertisement

दिशा दाखवणारे 'दिशा' अॅप


दिशा दाखवणारे 'दिशा' अॅप
SHARES

पश्चिम रेल्वेने एक असं अॅप तयार केलं आहे, ज्यामध्ये प्रवाशांना लोकलचं खरे वेळापत्रकच नाही तर स्टेशनवर कोणत्या सुविधा दिल्या जातील याची माहितीही घेता येणार आहे. दिशा नावाच्या या अॅपमध्ये रेल्वे लवकरच आणखी दोन नवीन फिचर जोडणार आहे. यामध्ये ट्रेनचे लाइव्ह अपडेट आणि उपनगरीय लोकलचं वेळापत्रक यांचा समावेश असणार आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या अॅपचे नाव दिशा आहे. या अॅपमुळे ट्रेनचे लाइव्ह अपडेट, एटीव्हीएमसह रिक्षा-टॅक्सी स्टँड, बुकिंग खिडकी, बस स्टँड यांसारख्या अनेक विषयांची माहिती प्रवाशांना होणार आहे. यासह हे अॅप जवळचे एटीएम, जीआरपी आणि आरपीएफ पोस्टची देखील माहिती देईल. हे अॅप एकदा डाऊनलोड केल्यानंतर पुन्हा इंटरनेटची गरज लागणार नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा