Advertisement

मुंबईत येणाऱ्या मजुरांसाठी अतिरिक्त रेल्वे धावणार

मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये कामगार पुन्हा येत आहेत. लॉकडाऊन दरम्यान अनेक कामगार आपल्या गावी गेले होते.

मुंबईत येणाऱ्या मजुरांसाठी अतिरिक्त रेल्वे धावणार
SHARES

कोरोना साथीच्या आजारामुळे मुंबई आणि दिल्लीमध्ये काम करणारे बरेच मजूर आपापल्या गावी गेले होते. पण गावी गेलेले मजूर पुन्हा मुंबईत येत आहेत. या मजूरांसाठी लवकरच मुंबईकडे जाण्यासाठी अनेक अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. गोमतीनगर स्टेशनला जागतिक दर्जाचे स्टेशन बनवण्याचं कामही डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल.

रेल्वे अनेक नवीन गाड्या नव्या वेळापत्रकासह चालवणार असून प्रवाशांना सोईस्कर होईल. हे ईशान्य रेल्वे डीआरएम डॉ. मोनिका अग्निहोत्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लॉकडाऊन दरम्यान ट्रॅकची दुरुस्ती रेल्वेनं पूर्ण केली असल्याचं डीआरएमनं सांगितलं.

रेल्वेनं ६०० कि.मी. अंतरावर मिनी रॅक चालवली आहेत. मल्टी पॉईंट रॅक आणि दोन पॉईंट लोडिंग सुविधा चालवण्यात येत आहेत जे 500 किमी पर्यंत चालवल्या जात आहेत.



हेही वाचा

सप्टेंबरमध्ये लोकल सुरू होण्याची शक्यता

कोकणातून परत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीच्या ज्यादा बसगाड्या

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा