Advertisement

रेल्वेची 'ही' सुविधा पुन्हा सुरू होणार, प्रवाशांना दिलासा

रेल्वे बोर्डानं शुक्रवारी एका पत्राद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.

रेल्वेची 'ही' सुविधा पुन्हा सुरू होणार, प्रवाशांना दिलासा
SHARES

कोरोना काळात बंद करण्यात आलेली जेवणाची सुविधा पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. कोविड काळात जेवणाची सुविधा बंद करण्यात आली होती. रेल्वे बोर्डानं शुक्रवारी एका पत्राद्वारे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (IRCTC)ही सेवा पुन्हा सुरू करण्यास सांगितलं आहे.

रेल्वे बोर्डानं असंही म्हटलं आहे की, प्रवाशांना 'रेडी टू इट' जेवण दिलं जाणार आहे. सामान्य रेल्वे सेवा पुन्हा सुरू करणं, प्रवाशांच्या गरजा आणि देशभरातील भोजनालये, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि कोविड निर्बंध शिथील झालेल्या ठिकाणी रेल्वेत शिजवण्यात आलेले जेवण देण्याची सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे रेल्वेत पुन्हा पॅन्ट्री कार सुरू होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

कोरोना महासाथीचा संसर्ग रोखण्यासाठी भारतीय रेल्वेनं ही सुविधा बंद केली होती. रेल्वेत शिजवलेले जेवण देण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्याशिवाय, प्लॅटफॉर्म तिकिटाचे दरही महाग करण्यात आले होते. प्लॅटफॉर्मचे तिकिट दर वाढवल्यामुळे रेल्वे स्थानकावर अनावश्यक गर्दी कमी होईल असा अधिकाऱ्यांचा अंदाज होता.

दरम्यान, रेल्वे तिकिट १५ टक्के स्वस्त होऊ शकतात. मागील आठवड्यात भारतीय रेल्वे प्रशासनानं स्पेशल ट्रेन या पुन्हा सामान्य करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. देशात कोरोना महासाथीचा संसर्ग कमी झाल्यानंतर रेल्वेनं पुन्हा एकदा लांब पल्ल्याच्या ट्रेन पूर्वीप्रमाणे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.



हेही वाचा

मुंबई बाहेर जाणाऱ्या एक्स्प्रेस पुढच्या वर्षीपासून जोगेश्वरीहून सुटणार

प्रवाशांनो लक्ष द्या! ‘या’ वेळेत ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा