Advertisement

मुंबई बाहेर जाणाऱ्या एक्स्प्रेस पुढच्या वर्षीपासून जोगेश्वरीहून सुटणार

यासाठी ७० कोटी खर्चाचे दोन अतिरिक्त प्लॅटफॉर्म पश्चिम रेल्वेनं (WR) बांधले आहेत.

मुंबई बाहेर जाणाऱ्या एक्स्प्रेस पुढच्या वर्षीपासून जोगेश्वरीहून सुटणार
SHARES

मुंबईबाहेर प्रवास करणाऱ्या लोकांना आता दिलासा मिळणार आहे. कारण पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला जोगेश्वरी रेल्वे स्थानकातून मुंबई बाहेर जाणाऱ्या गाड्या सुरू होणार आहेत. यासाठी ७० कोटी खर्चाचे दोन अतिरिक्त प्लॅटफॉर्म पश्चिम रेल्वेनं (WR) बांधले आहेत.

जोगेश्वरी स्थानकावर या गाड्या चालवण्यासाठी ३ अदलाबदल करणाऱ्या रेल्वे मार्गांसह, दोन रेल्वे प्लॅटफॉर्म आणि एका बेट प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल. झोनल रेल्वे मॅनेजरकडून गाड्या चालवण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला जातो. मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई बाहेर जाणाऱ्या गाड्या सुरू होतील.

यापूर्वी, रेल्वेनं जोगेश्वरीहून गुजरात आणि उत्तर भारताच्या दिशेनं जवळपास १०० गाड्या चालवण्याची योजना आखली होती. तथापि, कोविड-१९ साथीच्या आजारामुळे मुंबई बाहेर जाणाऱ्या गाड्यांना मागणी कमी आहे.

पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, या गाड्यांची मागणी कमी झाल्यामुळे ते जोगेश्वरी इथून चालवल्या जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येचं पुनर्मूल्यांकन करणार आहेत.

अलीकडेच, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शहराच्या उपनगरीय प्रणालीमध्ये आणखी वाढ करण्याच्या योजनांना होकार दिला. CR आणि WR अधिक एस्केलेटर, लिफ्ट आणि लॉजिस्टिक पार्क्स बसवणार आहेत. AC लोकल ट्रेन सेवांची संख्या वाढवण्याची तसंच सिंगल-जर्नी तिकिटांसाठी भाडे रचना सुधारण्याची देखील WR योजना आखत आहे.

दरम्यान, प्रायोगिक तत्त्वावर, WR नियमित तिकीट असलेल्या प्रवाशांना एसी गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्याचा आणि प्रवासादरम्यान भाड्यातील फरक भरण्याचा विचार करत आहे.



हेही वाचा

सर्वसामान्य प्रवाशीही करू शकणार एसी लोकलमधून प्रवास

प्रवाशांनो लक्ष द्या! ‘या’ वेळेत ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग बंद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा