Advertisement

बेस्टमध्ये ४०० गाड्यांसाठी कंत्राटी तत्त्वावर वाहकांची भरती

बेस्टमध्ये कंत्राटी तत्त्वावर चालकांसह बसगाड्या घेतल्यानंतर आता या ४०० गाड्यांसाठी कंत्राटी पद्धतीनं वाहक घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बेस्टमध्ये ४०० गाड्यांसाठी कंत्राटी तत्त्वावर वाहकांची भरती
SHARES

बेस्टमध्ये कंत्राटी तत्त्वावर चालकांसह बसगाड्या घेतल्यानंतर आता या ४०० गाड्यांसाठी कंत्राटी पद्धतीनं वाहक घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या वाहकांच्या नेमणुकीसाठी कंत्राटदारानं वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीनुसार प्रतीक्षा नगर आगारात इच्छुक उमेदवारांनी प्रचंड गर्दी केली होती. शेकडोंच्या संख्येनं उमेदवार या ठिकाणी जमल्यामुळं अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सामाजिक अंतराचे कोणतेही नियम न पाळल्यामुळं पोलिसांनी या कंत्राटदाराविरोधात कारवाई केली आहे.

बेस्टच्या गाड्यांचा देखभालीचा खर्च कमी करण्यासाठी व बेस्टचं उत्पन्न वाढून तोटा कमी करण्यासाठी उपक्रमानं २ वर्षांपूर्वी बेस्टमध्ये भाडेतत्त्वावर बसगाड्या घेण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेताना बसगाडी आणि चालक कंत्राटदाराचा असेल, मात्र गाडीवरील बोधचिन्ह आणि वाहक मात्र बेस्टचेच असतील अशी प्रमुख अट घालण्यात आली होती. मात्र, भदयच्या गाडय़ांना वाहक नसल्यामुळे बेस्टचेच नुकसान होऊ लागले. बसगाड्या मधल्या थांब्यावर थांबत नसल्याने बेस्टचे उत्पन्न कमी होऊ लागले. त्यामुळे आता पुन्हा कंत्राटी पद्धतीनेच वाहकही घेण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बेस्टच्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.

सध्या बेस्टकडे सुमारे १ हजार भाड्याच्या गाड्या आहेत. मात्र बेस्टच्या वाहकांची संख्या कमी आहे. पूर्वी बेस्टकडे सुमारे १० हजार वाहक होते. मात्र गेल्या काही वर्षांत ही संख्या ९ हजारांपर्यंत कमी झाली आहे. त्यातच या वाहकांना इतर अन्य कामेही दिली जात असल्यामुळे वाहकांची कमतरता भासू लागल्यामुळे वाहकही कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार मातेश्वरी ट्रान्सपोर्ट सोल्युशन प्रा. लि. या कंत्राटदाराने नुकतीच चालक व वाहक भरतीची जाहिरात दिली होती. ५ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत प्रतीक्षा नगर आगारात कागदपत्रांसह इच्छुकांना भेटण्याचे आवाहन केले होते. मात्र पहिल्याच दिवशी सोमवारी, ५ एप्रिलला इच्छुक उमेदवारांनी आगारात प्रचंड गर्दी केली. त्यामुळे अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला व ही प्रक्रिया थांबवावी लागली. तसेच पोलिसांनी या कंत्राटदारावर कारवाई केली आहे.



हेही वाचा -

गोरेगाव, वांद्रे आणि चेंबूरमध्ये ७ दिवसात सापडले सर्वाधिक कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात ८१ लाखापेक्षा अधिकांना कोरोना लसीचा पहिला डोस, केंद्राकडून कौतुक


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा