रिक्षा चालकांचा वर्धापन दिन उत्साहात

 Chembur
रिक्षा चालकांचा वर्धापन दिन उत्साहात

खारदेवनगर - माऊली रिक्षा चालक-मालक संघटना यांचा तृतीय वर्धापन दिन सोमवारी चेंबूरमधील खारदेवनगर मनोरंजन केंद्र इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संघटनेतर्फे प्रतिवर्षी विद्यार्थ्यांसाठी सामाजिक सांस्कृतिक कला आणि क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं जातं. विशेषत: बेटींबचाव या अभियानांतर्गत मुलींच्या विवाहासाठी संघटनेतर्फे आर्थिक मदत केली जाते, कौटुंबिक विमा, सभासद रिक्षाचालकास आपत्कालीन मदत केली जाते. या वेळी सभासदांना दिवाळी भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Loading Comments