Advertisement

मुंबईतील स्कूल बसचा प्रवास महागला

टोल वाढल्याने स्कूल बसच्या भाड्यात वाढ

मुंबईतील स्कूल बसचा प्रवास महागला
SHARES

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत मुंबईतील प्रवेशद्वारांवरील टोलनाक्यांमध्ये १ ऑक्टोबरपासून वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे स्कूल बस चालकांनी पाच टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली असल्याने याचा फटका 3500 विद्यार्थ्यांच्या पालकांना बसणार आहे.

किती वाढ झाली?

वाहन
पूराना टोल
नया टोल बढ़ोत्तरी
फोर व्हीलर
40
45
5
मिनी बस
65
 75
10
 ट्रक/बस 
 130 
150
20
भारी वाहन
260
290
30


ऐरोली, दहिसर पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग मुलुंड, लाल बहादूर शास्त्री मुलुंड ठाणे, वाशी सायन पनवेल महामार्गावरील टोल बुथवर वाहन शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी परिसरातील स्कूलबसच्या भाड्यात ५ टक्के वाढ करण्यात आली आहे. 

भाडेवाढीसंदर्भात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व बसचालकांनी भाडेवाढीला मान्यता दिली आहे. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.



हेही वाचा

मुंबई : मोनोरेलच्या वेळेत बदल, पहा नवे टाईमटेबल

MMRDA ठाण्यात मेट्रो लाइन 4 आणि 4A साठी डेपो बांधणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा