Advertisement

जोगेश्वरी स्थानकातील सहा लोकलचे थांबे रद्द, प्रवाशांचे हाल


जोगेश्वरी स्थानकातील सहा लोकलचे थांबे रद्द, प्रवाशांचे हाल
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावर १ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आलं आहे. असं असलं तरी या वेळापत्रकात जोगेश्वरी स्थानकातून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सहा जलद गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत गाड्यांचे थांबे रद्द केल्यामुळं प्रवाशांचे हाल होत आहेत.

याबाबत प्रवाशांनी जोगेश्वरी स्थानकातील स्टेशन मास्तरांसोबत चर्चा करत तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे जोगेश्वरी स्थानकातील सहा जलद गाड्यांचे रद्द केलेले थांबे पुन्हा सुरू होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


२६ गाड्यांच्या वेळात बदल

पश्चिम रेल्वे मार्गावरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकल फेऱ्यांचा विस्तार वाढवण्यात आलं आहे. १ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या लोकल गाड्यांचं वेळापत्रकही लागू करण्यात आलं आहे. वेळापत्रकात २६ लोकल गाड्यांच्या वेळात बदल करण्यात आला असून यामधील काही गाड्या जलद करण्यात आल्या आहेत.

मात्र, जोगेश्वरी स्थानकात चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सहा जलद गाड्यांचे थांबे रद्द केल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. तसंच, या गाड्यांचा समावेश सकाळच्या गर्दीच्या वेळेतील असल्यानं जोगेश्वरीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.


या गाड्यांचे थांबे रद्द

  • सकाळी ८ वाजून १५ मिनिटांची लोकल
  • सकाळी ८ वाजून २४ मिनिटांची लोकल
  • सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांची लोकल
  • सकाळी ९ वाजून ०५ मिनिटांची लोकल
  • सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांची लोकल
  • सकाळी ९ वाजून ५९ मिनिटांची लोकल

या सहा लोकल गाड्यांचे जोगेश्वरी स्थानकातील थांबे रद्द करण्यात आले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा